मुंबई, 7 एप्रिल- मालिका (Marathi serial) असो किंवा चित्रपट यानिमिताने कलाकरांना विविध ठिकाणी फिरावं लागतं. कितीतरी महिने ही कलाकार मंडळी आपल्या घरापासून, आपल्या लोकांपासून लांब असतात. बऱ्याचवेळा चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी भारताबाहेरसुद्धा (out of india) जावं लागतं. आपल्या लोकांना मिस करतात तसे हे कलाकार भारतीय जेवणालासुद्धा (indian food ) खूप मिस करत असतात. आणि जर परदेशात भारतीय पदार्थ खाण्याची संधी मिळाली तर…. तर हे लोक काय करतात ते अमृता खानविलकरने पोस्ट केलेल्या फोटोवरून दिसेल. ‘वेल डन बेबी’ (marathi film well done baby) या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमृता खानविलकर (amruta khanvilakar), पुष्कर जोग (pushkar jog) लंडनमध्ये (london) होते. तिथे त्यांनी चक्क बटाटावडा आणि शेवपुरी खाल्ली. लंडनच्या एका हॉटेलमध्ये वडापाववर ताव मारला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी ‘वेल डन बेबी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पहिल्यापासूनचं चाहत्यांना याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचा ट्रेलर जितका भन्नाट होता. तितकेच या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे किस्से मजेशीर आहेत. अमृता खानविलकर, पुष्कर जोग, वंदना गुप्ते यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. वैवाहिक आयुष्यातील कडवटपणामुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्याची ही कथा आहे. मात्र आयुष्याच्या या वळणावर या जोडप्याला आई वडील होणार असल्याचं समजत त्यानंतर यांच्या नात्याचं भविष्य काय ठरतं याभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. (**हे वाचा:** बॉलिवूडला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता ‘कबीर सिंग’च्या अभिनेत्रीला झाली लागण ) या चित्रपटाचं चित्रीकरण लंडन मधील काही ठिकाणी करण्यात आलं आहे. याबद्दल अमृताने आपली खास आठवण आपल्याशी शेअर केली आहे. अमृता म्हणते, ‘चित्रिकरण अगदी उत्तम चालू होतं. मला आणि ताईना म्हणजेच वंदना गुप्तेंना अगदी कौटुंबिक वातावरण वाटतं होतं. मात्र दररोजच्या विदेशी जेवणाला आम्ही कंटाळलो होतो. आणि त्यामुळे आम्हाला झणझणीत भारतीय जेवणाची चव हवी होती. यामध्ये आम्हाला मदत केली अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोगनं.’ पुष्करनं ‘हॉन्स्लो’ येथील एका भारतीय हॉटेल मध्ये आम्हाला मेजवानी दिली. याठिकाणी आम्ही झणझणीत शेवपुरी, वडापाव, बटाटापुरी, थालीपीठ यावर अक्षरशः ताव मारला. आणि शेवटी आल्याचा फक्कड चहा सुद्धा या कलाकारांनी घेतला. यावरून हेचं कळत सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायला कायम धडपड करत राहणार. याबद्दल बोलताना पुष्करनं म्हटलं आहे. मला सर्वात जास्त कोणतं ठिकाण आवडत असेल तर ते आहे ‘लंडन’. आणि या ठिकाणी आम्ही चित्रीकरण सुद्धा पूर्ण केलं आहे.