मुंबई, 23 एप्रिल : सध्याचं जग बदललं आहे. स्त्री-पुरुष समानता आली आहे. हे जरी खरं असलं तरी आजही थोड्याफार प्रमाणात स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो हेसुद्धा नाकारता येणार नाही. दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा लहान-लहान गोष्टीत हे पुरुषांसाठी आणि हे स्त्रियांसाठी असा मोजमाप लावण्यात येतो आणि याच मानसिकतेला आणि परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे तो मराठी अभिनेता अभिनेता (Marathi actor) अभिजीत खांडकेकरने (Abhijeet khandkekar).
खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुषात समानता आणण्यासाठी अभिजीत खांडेकरने आता एक धाडसी निर्णय घेतला आहे. फक्त घेतलाच नाही तर त्याने तो प्रत्यक्षातही आणला आहे. अभिजीतनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट (instagram post) केली आहे. जी सध्या मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अभिजीतच्या या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तो सुंदर अशा पारंपरिक वेशात दिसून येत आहे. पण तरी हे धोतरसामान्य धोतराप्रमाणे नाही तर थोडं वेगळं आहे, हे तुम्हालाही दिसलं असेल. खरंतर हे धोतर नाही तर साडी आहे. सोबत त्याने खांद्यावर तशीच शालही घेतली आहे.
हे वाचा - कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा
अभिजीतने ‘हिमरू, वीण’ असलेल्या साडीची सुरेख धोतर नेसली आहे. फक्त इतकंच नव्हे तर अभिजीतने या फोटोला उत्तम असं कॅप्शन देत पुरुषी मानसिकतेला छेद द्यायचा प्रयत्न केला आहे. तसंच पारंपरिक कपड्यांचा वसा सांभाळण्याचा महत्वाचा संदेश सुद्धा दिला आहे.
View this post on Instagram
फोटोला कॅप्शन देत अभिजीतनं म्हटलं आहे, ‘हे स्त्री चे कपडे , हे पुरूषांचे कपडे अश्या स्टिरिओटाईप्स् ला ‘राम राम’ करूया. लोप पावत चाललेल्या औरंगाबादच्या अनुभवी कुरेशी कुटुंबातल्या वीणकरांनी विणलेली ही ‘हिमरू’ वीण असलेली रेशमी साडी, धोतर म्हणून तेवढीच सुरेख दिसते. पारंपरिक वीणी (weaves) जपूया... आपल्या वॉर्ड्रोब मध्ये पारंपरिक वस्त्रांचा समावेश करूया.’
अभिजीत हा फक्त एक कलाकार म्हणूनच उत्तम नाही तर तो माणूस म्हणूनसुद्धा किती उत्तम आहे, हेच यातून दिसून येतं. अभिजीत हा स्वतः विविध पारंपरिक वेशात दिसून येतो. त्यामुळे त्याने जो संदेश समाजाला दिला ते तो स्वतः जगतो हेच दिसून येतं.
हे वाचा - 'तुला पाहते रे'च्या गोड ;ईशा'च्या मनमोहक अदा; गायत्रीचे PHOTO पाहून व्हाल फिदा
अभिजीत बद्दल बोलायचं झालं तर, झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत त्यानं ‘गुरू’ची भूमिका साकारली होती. या मालिकेने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. यातील प्रत्येक पात्रे लोकांना तोंडपाठ झाली होती. या मालिकेमध्ये अभिजीत निगेटिव्ह भूमिकेत होता, तरीसुद्धा त्याची लोकप्रियता प्रचंड होती. काही दिवसांपूर्वीचं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. लवकरच अभिजीत ‘क्रिमिनल-चाहूल गुन्हेगारांची’ या कार्यक्रमामध्ये होस्टच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.