कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा

कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा

66 वर्षांचे श्रवण राठोड (shravan rathod) यांचं कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : कोरोनाचा (coronavirus) हाहाकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वसामान्यांसोबतच अनेक कलाकारांना कोरोनामुळे आयुष्याला मुकावं लागलं आहे. नुकतीच बॉलिवूडमधील (bollywood) प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील (nadim-shravan) श्रवण राठोड (shravan rathod) यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. कुंभमेळ्यातून परतल्यानंतर त्यांना कोरोना झाला होता, असा खुलासा त्यांचा मुलगा संजीवने केला आहे.

श्रवण हे 66 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईच्या माहीममधील एस.एल. रहेजा या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार श्रवण हे काही दिवसांपूर्वी हरिद्वार (haridwar) येथे कुंभमेळ्यामध्ये (kumbhmela) सहभागी होण्यासाठी गेले होते. तेथून मुंबईला परतल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती.

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्वतः श्रवण यांचा मोठा मुलगा संजीवने ही माहिती दिली आहे. एबीपीशी बोलताना संजीव यांनी म्हटलं होतं, ‘हा हे खरं आहे माझे बाबा हरिद्वारला कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि तिथून आल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. आणि खूपच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे आम्ही त्यांना एस.एल. रहेजा या रुग्णालयात दाखल केलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील काही भाग काम करत नसल्याचंही समोर आलं होतं. आणि शेवटी या सर्व आजारांच्या विळख्याने त्यांचं निधन झालं.

हे वाचा - शाहरूख खानच्या बायको-मुलाचा VIDEO पाहून भडकले नेटिझन्स; गौरी-आर्यन होतायेत ट्रोल )

"बाबांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझी, माझा भावाची आणि आईचीसुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये माझ्या भावाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र माझा आणि आईचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता", असं संजीवने सांगितलं.

सध्या सांगायचं झालं तर श्रवण यांच्या मोठ्या मुलावर आणि पत्नीवर मुंबईच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर छोटा मुलगा दर्शन घरीचं आयसोलेशनमध्ये आहे

हे वाचा -  बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचं Cardiac Arrest मुळे निधन

नदीम-श्रवण यांच्या जोडीने नव्वदचा काळ गाजवला आहे. यांनी अनेक सुपरहिट संगीत दिले आहेत. या जोडीने आशिकी, साजन तसेच आमिर खानच्या राजा हिंदुस्तानी आणि शाहरुख खानच्या परदेस चित्रपटात सर्वोत्तम संगीत दिलं आहे. जे आजही आवर्जून ऐकलं जातं. 2000 मध्ये विभक्त झाल्यानंतर परत 2009 मध्ये डेविड धवन यांच्या ‘डू नॉट डिस्टर्ब’ साठी त्यांनी संगीत दिलं होतं.

Published by: Aiman Desai
First published: April 23, 2021, 4:59 PM IST

ताज्या बातम्या