मुंबई, 29 एप्रिल- काही मराठी मालिकांनी (Marathi Serial) प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. वेगळ्या धाटणीच्या कथा प्रेक्षकांना भुरळ घालत असतात. त्याच मालिका पुन्हा पाहायलाही प्रेक्षक तयार अशतात. अशीच एक मराठी मालिका म्हणजे ‘जिवलगा’(Jeevlaga) ही होय. सर्व मालिकांमध्ये प्रेम ही चौकट असतेच मात्र याचं प्रेमामध्ये असणाऱ्या विविध छटा यामध्ये दाखविण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वीची ही मालिका पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला(Come Back On Tv) येणार आहे.
सध्या कोरोनाचा हाहाकार वाढतचं चालला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लावलं आहे. त्यामुळे सध्या माहाराष्ट्रात मालिका आणि चित्रपटांचं शुटींग बंद आहे. त्यामुळे अनेक जुन्या मालिका प्रेक्षकंना बघायला मिळत आहेत. अशीच एक मराठी मालिका 2019 मध्ये आली होती. आणि ही मालिका प्रचंड लोकप्रियसुद्धा झाली होती. ती मालिका म्हणजे जिवलगा होय. या मालिकेमध्ये तगडी स्टारकास्ट सुद्धा होती. ही मालिका चाहत्यांच्या आग्रहामुळे पुन्हा छोट्या पडद्यावर परत येत आहे.
2019 मध्ये आलेली ‘जिवलगा’ या मालिकेमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर तसेच मधुरा देशपांडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली होती. स्टार प्रवाह या वाहिनीवर ही मालिका प्रक्षेपित होत होती. आपलं प्रेम आपली नाती यांना समजून घेण्यात माणूस बऱ्याच वेळा चुका करतो. त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतो. अशा प्रेमाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी ही मालिका होती. (हे वाचा: VIDEO: पुण्यात मराठी कलाकार सरसावले; ‘पाठक बाई’, ‘फास्टर फेणे’ पोलीस स्टेशनात ) या मालिकेतील कलाकरांनी प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती. मालिकेने निरोप घेतल्या नंतर अनेकवेळा ती परत चालू करण्यासाठी सोशल मीडियावर आग्रहदेखील व्हायचे. याच आग्रहला ग्रीन सिग्नल देत आणि योग्य वेळ साधत मालिकेला पुन्हा छोट्या पडद्यावर आणलं जातं आहे. येत्या 2 मे पासून दर रविवारी सायंकाळी 6 वाजता ही मालिका आपल्याला स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

)







