मुंबई, 29 एप्रिल- देशभरात सध्या कोरोनाचा विळखा(Coronavirus) वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात (maharashtra) सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा आणि शुटींगसुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकार आपल्याला जमेल त्या पद्धतीने लोकांना सावध करत आहेत. आणि कोरोनायोद्धांना प्रोत्साहन देत आहेत. असचं काहीसं दिसून आलं पुणे शहरामध्ये, मराठीतील प्रसिद्ध कलाकार (Marathi Stars) अमेय वाघ (Amey Wagh), मृण्मयी देशपांडे (Mrunmai Deshapande), अक्षया देवधर(Akshaya Devdhar) आणि संस्कृती बालगुडे (Sanskriti Balgude) यांनी आज सिंहगड पोलीस स्टेशनला (Sinhgad Police Station) भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं.
View this post on Instagram
कोरोनामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. या कठीण काळात आरोग्य कर्मचारी, पत्रकार आणि पोलीस हे लोक आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी धडपडत आहेत. अहोरात्र त्यांची सेवा करत आहेत. स्वतःचं कुटुंब सोडून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे या सर्वांचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे. यातूनचं त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आणि अशीच अविरत सेवा सुरु ठेवण्यासाठी बळसुद्धा मिळणार आहे.
(हे वाचा:अजय देवगण ते सोनू सूद; पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे लॉकडाऊनमधील Photo )
हीच बाब लक्षात घेऊन या, आणि आपली सामाजिक जबाबदारी ओळखून या मराठी कलाकारांनी हा उपक्रम राबविला आहे. सर्वांचा लाडका अभिनेता अमेय वाघ याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि त्यामध्ये म्हटलं आहे, ‘आम्ही पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनला आज भेट दिली आहे. कोरोनामुळे देशाची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. या परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी ताकतीने हे पोलीस फोर्स लढा देत आहे. संघर्ष करत आहे. दुसर काहीही नको मात्र प्रत्येकांना दोन मायेचे आणि आत्मविश्वासाचे शब्द हवे असतात. त्यासाठीच आज आम्ही याठिकाणी आलो आहोत. त्यांच्याशी बोलून, त्यांना सांगायचं आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुमच्या कामाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमचे खूप खूप आभार या सर्वांसाठी अशा आशयाचा व्हिडीओ अमेयनं पोस्ट केला आहे. त्याचबरोबर पोलिसांना भेटून त्यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत.
(हे वाचा:Ratris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता )
आपल्या लाडक्या कलाकारांना सामजिक जाणीव आहे. परिस्थितीची जाणीव आहे. हे पाहून चाहते सुद्धा भारावले आहेत. आणि या कलाकारांचं कौतुक सुद्धा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Pune