'गालाच्या खळीनेचं घेतली विकेट'; वाचा सचिन-सुप्रियाची धम्माल Love Story

सचिन पिळगांवकर(Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर(Supriya Pilgaonkar) जवळजवळ 32 वर्षे ही जोडी अगदी आनंदाने संसार फुलवत आहे.

सचिन पिळगांवकर(Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर(Supriya Pilgaonkar) जवळजवळ 32 वर्षे ही जोडी अगदी आनंदाने संसार फुलवत आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून- मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry)   एक खुपचं गोड जोडी आहे. त्यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केलं आहे. आणि विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यातसुद्धा एकमेकांसोबत संसार थाटला आहे. जवळजवळ 32 वर्षे ही जोडी अगदी आनंदाने संसार फुलवत आहे. ती जोडी म्हणजे सचिन पिळगांवकर(Sachin Pilgaonkar)  आणि सुप्रिया पिळगांवकर(Supriya Pilgaonkar)  होय. या जोडीकडे बघून खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो अशी ही जोडी आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे ते एकमेकांना कसे भेटले? किंवा त्यांची लव्हस्टोरी कशी बहरली? चला जाणून घेऊया त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल.
    ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठीतील प्रसिद्ध चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. हा चित्रपट सचिन पिळगांवकर यांनीच दिग्दर्शित केला आहे. यामध्ये त्यांची सह कलाकार म्हणून सुप्रियाचं होत्या. एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी असं देखील म्हटलं आहे की, सुप्रिया यांच्या गालावर खुपचं सुंदर खळी पडते आणि त्यावरचं सचिनजी भाळले होते. या चित्रपटामुळेच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. (हे वाचा:सोनाली कुलकर्णीचं चक्क समुद्रकिनारी 'उंच माझा झोका'; पाहा भन्नाट VIDEO  ) पुढे त्यांनी 1985 मध्ये लग्नसुद्धा करण्याचं ठरवलं होतं. मात्र सुप्रिया या केवळ 17 वर्षांच्या होत्या. तर सचिन 27 वर्षांचे होते. या दोघांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांचं अंतर होतं. त्यामुळे सर्वांनाचं असं वाटायचं की हे नात फार काळ नाही टिकणार. मात्र या जोडीने सर्वांनाचं चुकीचं ठरवलं. त्यांच्या प्रेमाने त्यांच्या नात्यात कधी वयाची अडचण होऊ दिली नाही. आणि आज जवळजवळ 32 वर्षे झालं ते गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. (हे वाचा:VIDEO: चक्क स्वामींवरचं झाला जीवघेणा आघात; कोण असणार या षडयंत्रामागे?  ) या गोड जोडप्याला एक मुलगीसुद्धा आहे. तिचं नाव श्रिया पिळगांवकर असं आहे. आणि ती आपल्या सर्वांनच्याच परिचयाची आहे. कारण तीसुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तर तिने ‘झिरो’ सारख्या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केलं आहे. तसेच ती विविध भाषांमध्ये सुद्धा काम करत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: