जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: चक्क स्वामींवरचं झाला जीवघेणा आघात; कोण असणार या षडयंत्रामागे?

VIDEO: चक्क स्वामींवरचं झाला जीवघेणा आघात; कोण असणार या षडयंत्रामागे?

VIDEO: चक्क स्वामींवरचं झाला जीवघेणा आघात; कोण असणार या षडयंत्रामागे?

कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने अगदी कमी वेळेत लोकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून- स्वामी समर्थांच्या अनेक कथा आपल्यासमोर उलघडण्याचं काम कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jay Jay Swami Samarth) ही मालिका करत आहे. यानिमित्ताने आपल्याला स्वामी समर्थांची शिकवण तसेच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पाहायला मिळत आहे. या मालिकेने चाहत्यांवर अक्षरशः गारुड घातलं आहे. ही मालिका खुपचं पसंत केली जात आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये मात्र चक्क स्वामींवरचं कोणीतरी आघात केलेला दिसून येत आहे.

जाहिरात

कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने अगदी कमी वेळेत लोकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं आहे. महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक किस्से या मालिकेमुळे पाहायला मिळत आहेत. एखाद्या माणसाचं आयुष्य म्हणजे काय असतं. त्याला आयुष्य जगताना कोणत्या गोष्टी आत्मसात करायला हव्या. लोभ, मोह, धूर्तपणा सोडून इतरांच्या सुखात सुखी  होऊन माणसाला जगता यावं हेच यातून दाखवण्यात आलं आहे.भक्ती म्हणजे नेमकं काय असतं. आणि खरी भक्ती असेल तर स्वामी त्याच्या पाठीशी सदैव उभे असतात. हे यातून सांगण्यात आलं आहे. (हे वाचा: सोनाली कुलकर्णीचं चक्क समुद्रकिनारी ‘उंच माझा झोका’; पाहा भन्नाट VIDEO   ) मालिकेमध्ये धूर्त लोक स्वामींना आणि त्यांच्या भक्तांना त्रास देण्यासाठी कसं प्रयत्न करतात. आणि स्वामी यातून कसे भक्तांना सोडवतात. असं दाखवण्यात येत आहे. मात्र नवीन प्रोमोमध्ये चक्क स्वामींवरचं कोणीतरी आघात केला आहे. प्रसादाच्या डब्यातून मधमाश्या भरून पाठवण्यात आल्या आहेत. इतकचं नव्हे तर एका मधमाशीने स्वामींच्या कानाचा चावा घेतला आहे. आणि स्वामींच्या कानातून रक्ताची धार लागली आहे. असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. स्वामींवर हा आघात करणारा नेमका कोण आहे आणि आत्ता स्वामी त्याला नेमकं कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत अभिनेता अक्षय मुदावडकर यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. त्यांनी या व्यक्तीरेखेला पूर्ण न्याय दिल्याचं चाहत्यांकडून सांगण्यात येत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात