सोनाली कुलकर्णीचं चक्क समुद्रकिनारी 'उंच माझा झोका'; पाहा भन्नाट VIDEO

सोनालीने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती चक्क निळ्याशार समुद्रकिनारी उंच झोका घेताना दिसत आहे.

सोनालीने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती चक्क निळ्याशार समुद्रकिनारी उंच झोका घेताना दिसत आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून-  लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच कलाकार घरी आहेत. त्यामुळे सर्व कलाकार ही वेळ एन्जॉय करत आहेत. अभिनेत्री (Actress)  सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तर सध्या आपल्या पतीसोबत दुबईत आहे. आणि तेथील प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. सोनालीने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) शेयर केला आहे. त्यामध्ये ती चक्क समुद्रकिनारी उंच झोका घेताना दिसत आहे.
    मराठमोळी अभिनेत्री सोनाली सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. लॉकडाऊनमुळे शुटींग बंद असल्याने सर्व कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सोनाली कुलकर्णीसुद्धा आपल्या सोशल मीडियावरून सतत फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आपल्या खास अपडेट देत असते. (हे वाचा:उफफ्! वैभवचा शायराना अंदाज; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात  ) सोनालीने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती चक्क निळ्याशार समुद्रकिनारी उंच झोका घेताना दिसत आहे. हा समुद्रकिनारा पूर्व आफ्रिकेतील आहे. सोनाली आपल्या पतीसोबत तेथे सुट्टीचा आनंद घेत आहे. तसेच सोनाली सध्या खुपचं फिटनेस कॉन्शीअस झाली आहे. सध्या ती आपला संपूर्णवेळ फिटनेसवर देत आहे. सोनालीला सतत विविध व्यायाम करताना पाहायला मिळत आहे. ती सतत आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या व्यायामाचे व्हिडीओ शेयर करत असते. इतकचं नव्हे तर सोनाली आपल्या पतीसोबत व्यायाम करत सर्व नेटकऱ्यानां कपल गोल देत असते. (हे वाचा: तारक मेहता...फेम बबिताला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; वाचा काय होतं नेमकं प्रकरण  ) सोनाली कुलकर्णीने गेल्यावर्षी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आत्ता नुकताच सोनालीने कुणालसोबत लग्नही उरकून घेतलं आहे. सोनाली कुणालला भेटण्यासाठी दुबईला गेली होती. मात्र लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली होती. त्यामुळे त्यांनी दुबईमध्येच आपलं लग्न उरकून घेतलं होतं. सोनाली सध्या कुणालसोबत आपल्या नव्या संसाराचा आनंद घेत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: