मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO'जिंकलस मित्रा' रोहित राऊतच्या 'आली ठुमकत' गाण्यावर चाहत्यांच्या जबरदस्त कमेंट

VIDEO'जिंकलस मित्रा' रोहित राऊतच्या 'आली ठुमकत' गाण्यावर चाहत्यांच्या जबरदस्त कमेंट

 रोहित राऊत(Rohit Raut)  मराठीतील उत्कृष्ट गायक म्हणून ओळखला जातो.

रोहित राऊत(Rohit Raut) मराठीतील उत्कृष्ट गायक म्हणून ओळखला जातो.

रोहित राऊत(Rohit Raut) मराठीतील उत्कृष्ट गायक म्हणून ओळखला जातो.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 29 मे-  रोहित राऊत(Rohit Raut)  मराठीतील उत्कृष्ट गायक म्हणून ओळखला जातो. अगदी लहान वयात त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. रोहितच्या आवाजावर लाखो लोक फिदा आहेत. रोहित सतत सोशल मीडियावरून आपल्या आवाजाचा जादू पसरवत असतो. नुकताच रोहितने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर(instagram Video) केला आहे त्यामध्ये सुद्धा तो एका सदाबहार गाण्याचा आस्वाद घेत आहे.

रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मनमौला अंदाजात एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तो मराठीतील सदाबहार गीत ‘आली ठुमकत, नार..’ हे गाणं म्हणताना दिसून येत आहे. रोहित आपल्या आवाजने अक्षरशः चाहत्यांना खिळवून ठेवतो. त्याच्या या व्हिडीओला चाहते खुपचं पसंत करत आहेत. आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा मिळत आहेत. चाहत्यांनी कमेंट करत रोहितला 'जिंकलस मित्रा' असं देखील म्हटलं आहे.

(हे वाचा:'बिग बॉस 15' ची प्रतीक्षा लवकरच संपणार, 'या' स्पर्धकांचा असणार समावेश  )

रोहित सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो आपल्या विविध व्हिडीओमधून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. सतत वेगवेगळ्या गाण्यांमधून आपलं कौशल्य दाखवत असतो. चाहतेही त्याला चांगला प्रतिसाद देत असतात.

(हे वाचा:HBD: इंजिनीअरिंग सोडून धरली अभिनयाची वाट, पाहा पंकज कपूर यांचा अनोखा प्रवास  )

रोहित सर्वप्रथम झी टीव्हीवरील सारेगमपा लिटल चेम्प मध्ये झळकला होता. त्यानंतर झी मराठीवरील सारेगमपा लिटल चेम्पच्या शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये त्याचा समावेश होता. रोहितने अगदी कमी वयात गाण्याला सुरुवात केली होती. मराठीतील प्रसिद्ध चित्रपट ‘दुनियादारी’ मधून त्याने पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं होतं. रोहितने फक्त चित्रपटच नव्हे तर अनेक मराठी मालिकांमध्ये सुद्धा गायन केल आहे. रोहितने संगीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं आहे. ‘मोगरा फुलला’ हा त्याचा संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. रोहितने मराठी चित्रपटसृष्टीत आपला एक विशिष्ट ठसा उमठवला आहे.

First published:

Tags: Marathi entertainment