मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: इंजिनीअरिंग सोडून धरली अभिनयाची वाट, पाहा पंकज कपूर यांचा अनोखा प्रवास

HBD: इंजिनीअरिंग सोडून धरली अभिनयाची वाट, पाहा पंकज कपूर यांचा अनोखा प्रवास

 पंकज कपूर (Happy Birthday Pankaj Kapoor) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

पंकज कपूर (Happy Birthday Pankaj Kapoor) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

पंकज कपूर (Happy Birthday Pankaj Kapoor) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

मुंबई, 29 मे- आपण कलाकारांना नाटकात, चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारताना बघत असतो. मात्र आपल्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नसते. त्या व्यक्तीला आपण त्यांनी केलेल्या व्यक्तिरेखांवरून जोखत असतो. पण अनेक कलाकारांच्या खासगी आयुष्यातील किस्सेही खूप रोमांचक आणि अगदी चित्रपटांसारखेच असतात. त्यांनाही खूप संघर्ष करावा लागलेला असतो त्यांनी अपयश पचवलेलं असतं. अशीच स्टोरी आहे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याची. पंकज कपूर (Happy Birthday Pankaj Kapoor) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंकज कपूर कोण असा प्रश्न पडला असेल तर हिरो शाहिद कपूरचे वडिल(Shahid Kapoor's Father) असंही तुम्ही म्हणू शकता. आज त्यांच्या वाढदिवसामनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या प्रोफेशनल तसंच खासगी आयुष्याविषयी.

View this post on Instagram

A post shared by Sanah Kapur (@sanahkapur15)

पंकज यांचा जन्म 29 मे 1954 ला पंजाबमधील लुधियाना इथं झाला. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेताना तिथं टॉपर असलेल्या पंकज यांना अभिनय करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (National School of Drama) प्रवेश घेतला. पदवी पूर्ण झाल्यावर त्यांनी 4 वर्षं नाटकांत काम केलं. 1982 मध्ये आलेल्या गांधी (Gandhi) या चित्रपटातून पंकज कपूर यांना हिंदी चित्रपटांत काम करण्याची पहिली संधी मिळाली. त्यात त्यांनी महात्मा गांधींचे असिस्टंट प्यारेलाल नय्यर यांची भूमिका साकारली होती. तसंच त्यांनी जाने भी दो यारों, रोजा, राख, एक डॉक्टर की मौत, मकबूल अशा सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या ज्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी साधेपणाने वठवायची हा त्यांच्या अभिनयाचा विशेष गुण आहे.

(हे वाचा: HBD: 33 वर्षांची झाली 'कुबुल है' फेम सुरभी ज्योती, पाहा तिच्या काही खास गोष्टी  )

खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर त्यांनी 1975 मध्ये नीलिमा अझीम या 16 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांचा मुलगा अभिनेता शाहिद कपूर. पण 9 वर्षांनंतर पंकज यांनी नीलिमा यांना घटस्फोट दिला. त्यानंतर पंकज यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केलं. त्यांना सनाह कपूर आणि रुहान कपूर अशी दोन मुलं आहे. शानदार चित्रपटात सावत्र भाऊ शाहिद कपूर (Actor Shahid Kapoor) सोबत सनाह कपूरने अभिनय केला होता.

(हे वाचा: HBD:'म्हणून मेकअप रूमचं दार तोडलं', मृण्मयी देशपांडेने सांगितला भन्नाट किस्सा  )

पंकज यांचं प्रोफेशनल आयुष्य जबरदस्त आहे. मकबूलमध्ये त्यांनी साकारलेल्या जहाँगीर खान या भूमिकेने तर तरुणपिढीही त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडली. तरुणांनाही ते आपले प्रेरणास्रोत वाटू लागले. पंकज कपूर यांना राख आणि एक डॉक्टर की मौत या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारही (National Film Award) मिळाले आहेत. पंकज कपूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

First published:

Tags: Bollywood