मुंबई, 29 मे- कलर्सवरील ‘बिग बॉस’ (Bigg Boss) या शोची मोठी लोकप्रियता आहे. चाहते आतुरतेने या शोच्या प्रत्येक सीजनची वाट बघत असतात. ‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) हा सीजन नुकताचं संपला होता. यामध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबिना दिलैक विजेती ठरली होती. आत्ता लवकरच ‘बिग बॉस 15’(Bigg Boss 15) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
कलर्स वाहिनीवर ‘बिग बॉस’ हा शो प्रदर्शित होतो. यामध्ये विविध कलाकार सहभागी होतात. आणि जवळजवळ 3 महिने ते बिग बॉसच्या घरामध्ये बंधिस्त असतात. या घरामध्ये राहताना त्यांच्यामध्ये होणारे वाद, कलाकारांची मैत्री, कित्येक लव्हस्टोरी आणि विविध मजामस्ती हे सर्व पाहणं चाहत्यांना खुपचं आवडत. त्यामुळे या शोची लोकप्रियता प्रचंड आहे.
फेब्रुवारी महीन्यामध्ये ‘बिग बॉस 14’ हा सीजन संपला होता. यामध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक विजेती ठरली होती. हा सीजन खुपचं लोकप्रिय ठरला होता. त्यामुळे चाहत्यांना आत्ता पुढच्या सीजनची प्रतीक्षा लागली आहे.
(हे वाचा:HBD: 33 वर्षांची झाली 'कुबुल है' फेम सुरभी ज्योती, पाहा तिच्या काही खास गोष्टी )
ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं दिसत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये याशोचं प्रिमियर होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या शोचा होस्ट सलमान खानने सीजन 14 च्या फिनालेमध्ये सांगितल होतं, की सीजन 15 मध्ये कलाकरां व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे आपल्या टीव्ही कलाकारांपैकी इतरही नवे चेहरे पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
(हे वाचा: सुशांतवर वादग्रस्त ट्वीट करणं दिग्दर्शकाच्या अंगाशी, चाहत्यांकडून ट्रोल)
तसेच या शोमध्ये टीव्हीवरील एक्स जोड्यांचा देखील समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आणि पती पत्नी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनासुद्धा विचारणा करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. तसेच बालिकावधू मधून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री नेहा मर्दासुद्धा या शोमध्ये दिसू शकते. त्यामुळे बिग बॉस 15 साठी चाहते खुपचं उत्सुक झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment