मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लॉकडाउनचा परिणाम मालिकांच्या कथानकावरही, 'देवमाणूस'चे कलाकार वाड्यात नाहीतच

लॉकडाउनचा परिणाम मालिकांच्या कथानकावरही, 'देवमाणूस'चे कलाकार वाड्यात नाहीतच

सोमवारपासून मालिकांच्या नव्या एपिसोड्सची सुरुवात झाली. पण यावेळी मालिकांमध्ये काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, पाहिले न मी तुला यामध्ये काय बदल झालेत पाहा...

सोमवारपासून मालिकांच्या नव्या एपिसोड्सची सुरुवात झाली. पण यावेळी मालिकांमध्ये काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, पाहिले न मी तुला यामध्ये काय बदल झालेत पाहा...

सोमवारपासून मालिकांच्या नव्या एपिसोड्सची सुरुवात झाली. पण यावेळी मालिकांमध्ये काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, पाहिले न मी तुला यामध्ये काय बदल झालेत पाहा...

  • Published by:  News Digital

मुंबई 27 एप्रिल: सध्या देशभरात कोरोनाने थैमान (corona pandemic) घातलेलं पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. याचा परिणाम टेलिव्हिझन इंटस्ट्रीवरही होताना दिसत आहे. काही मालिकांचं चित्रिकरण पूर्णपणे खंडीत करण्यात आलं होतं. त्यामुळे निर्मात्यांनी राज्याबाहेर जाऊन शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि आता जवळपास सगळ्याच मालिकांच चित्रिकरण हे राज्याबाहेर सुरू आहे. पण याचा परिणाम मालिकेच्या मूळ कथानकावरही होताना दिसत आहे.

सोमवारपासून मालिकांच्या नव्या एपिसोड्सची सुरुवात झाली. पण यावेळी मालिकांमध्ये काहीसं वेगळं चित्र पहायला मिळाल. झी मराठी (Zee Marathi)  वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’चं (yeu kasha tashi mi nandayla)  शूटिंग हे सिल्व्हासा ला सुरु आहे. त्यामुळे मालिकेचा सेट ही पूर्णपणे बदलेला दिसत आहे. अंबरनाथच्या चाळीत राहणारं स्वीटूचं साळवी कुटुंब आता एका तीन मजली इमारतीत राहताना दाखवलं आहे. त्यामुळे मूळ चाळीत राहणारं कुटुंब ही मालिकेची मूळ कथा असताना त्यात बदल झाला आहे.

याशिवाय प्रसिद्ध ‘देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेतही फार मोठा बदल झाला आहेय त्यांनी कोणताही नवा वाडा उभारला नाही. तर कथेतच बदल करून वाड्यातील सगळे सदस्य हे एका रिसॉर्ट वर रहायला गेले आहेत. तर हे रिसॉर्ट डॉक्टरच्या मालकीच दाखवलं असून डॉक्टरने ते मंजुळाच्या जमिनीवर उभारलं आहे. व वाड्यातील सगळ्या लोकांना तो रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी घेऊन गेला आहे. व काही दिवस आता सगळेजण तिथेच राहणार आहेत. या मालिकेचे शुटींग सध्या बेळगावात हलवण्यात आलं आहे.

इतर मालिकांच्या सेट मध्येही बदल झाले आहेत. ‘पाहिले न मी तुला’ (pahile na mi tula), ‘अग्गबाई सुनबाई’ (aggabai sunbai) या मालिकांतील घरं बदलली आहेत पण कथेत मात्र बदल केला नाही. पण ‘कारभारी लयभारी’ (karbhari laybhari)  या मालिकेबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. तर नवे एपिसोडही आले नाहीत शनिवार पासून मालिकेचे भाग बंद आहेत. व या मालिकेच्या जागी पाहीले न मी तुला ही मालिका दाखवली जात आहे. त्यामुळे ही मालिका आता कधी सुरु होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर या मालिकेत नक्की काय बदल होणार हे पाहणं महत्तवाचं ठरेल.

बॉलिवूडच्या 'फॅमिली'मध्ये संपत्तीवरून ड्रामा, राजीव कपूर यांच्या मालमत्तेसाठी रिमा-रणधीर कोर्टात

‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris khel chale)  ही मालिका मात्र सुरळीत सुरू आहे. मालिकेची एपिसोड बँक तयार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मालिकेचं शूटींग तुर्तास बंद असलं तरीही मालिका सुरळीत सुरु आहे आणि चित्रिकरण कुठेही हलवण्यात आलं नाही.

मालिकांमध्ये घडलेला हा बदल आता प्रेक्षक कसा स्वीकारतात आणि याला कशी दाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee Marathi, Zee marathi serial