मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये आला नवा टर्न; लतिकाची सैराट एन्ट्री पाहून अभ्या झाला फिदा

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये आला नवा टर्न; लतिकाची सैराट एन्ट्री पाहून अभ्या झाला फिदा

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundra Manamdhye Bharali)  मालिका अगदी कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundra Manamdhye Bharali) मालिका अगदी कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे

‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundra Manamdhye Bharali) मालिका अगदी कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे

मुंबई, 23 मे - ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundra Manamdhye Bharali)  मालिका अगदी कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. बारीक, रेखीव बांध्याची अभिनेत्री या संकल्पनेला छेद देत, भरभक्कम शरीराची अभिनेत्री या मालिकेत पाहायला मिळाली. अशा आगळ्यावेगळ्या विषयावरच्या या मालिकेने एक नवा आदर्श ठेवला आहे. नुकताचं या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला आह. त्यामध्ये लतिका (Latika) एकदम सैराट पद्धतीने बाईक वरून एन्ट्री घेते. हे पाहून चाहते फारचं उत्सुक झाले आहेत.

कलर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रदर्शित होते. या मालिकेने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता महत्वाची आहे. हे यातून सांगण्यात आलं आहे. यातील गोड जोडी अभिमन्यू आणि लतिका यांचं उंदीर मांजराचं प्रेम आत्ता प्रेमात बदलत आहे.

(हे वाचा: मुलीला पदवीधर झालेलं पाहून शिल्पा शिरोडकर झाली भावुक; फोटो शेअर करत म्हणाली... )

सध्या ,मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे, अभ्याला पैशांची गरज असते. आणि त्यासाठी तो आपली प्राणप्रिय बाईक विकतो. ही गोष्ट जेव्हा लतिकाकाला कळते तेव्हा ती अभ्याची बाईक परत आणते. नवीन रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये असचं दाखवण्यात आलं आहे, ‘अभ्या आपल्या मित्राशी बाईक बद्दल सांगून दुखी होतं असतो. आणि तेवढ्यात लतिका त्याचं बाईकवरून अगदी आर्ची सारखी एन्ट्री घेते. हे पाहून अभ्यापण आश्चर्यचकित होतो. अभ्या म्हणतो की तुई फक्त बाईक नाही तर, त्याची ‘मेहबूबा’ आहे.

(हे वाचा: Video: नेहा धुपियाच्या पतीनं केली कोरोनावर मात; घरी पोहोचताच झाला भावुक )

मालिकेमध्ये सुरुवातीलाचं लतिका आणि अभिमन्यूचं लग्न झालं होतं. मात्र हे दोघांच्याही इच्छेविरुद्ध असतं. त्यामुळे या दोघांनीही एक गोष्ट ठरवलेली असते. की काही महिन्यानंतर हे लग्न तोडायचं आणि आपलं आपलं आयुष्य जगायचं. मात्र सध्या अभ्याला लतिकाचा भोळेपणा, आणि चांगुलपणा पाहून तिच्यावर प्रेम जडलं आहे. मात्र लतिकाला हे सांगण्याचं त्याचं धाडस होतं नाहीय. येत्या काळात यांची लव्हस्टोरी कशी फुलते हेचं पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial