'त्याने मित्रांसमोर माझी', घटस्फोटानंतर करिश्माने केला होता धक्कादायक खुलासा

करिश्माने लग्नाच्या 11 वर्षानंतर या दोघांनीही घटस्फोट घेतला होता.

करिश्माने लग्नाच्या 11 वर्षानंतर या दोघांनीही घटस्फोट घेतला होता.

  • Share this:
    मुंबई, 21 जून- बॉलिवूडची (Bollywood)  लोलो म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूरने(Karishma Kapoor) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं होतं. 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देत करिश्मा एक लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. मात्र करिश्माचं प्रोफेशनल आयुष्य जितकं सुंदर होतं. तितकचं तिचं खाजगी आयुष्य दुखद होतं. करिश्माने लग्न तर केलं मात्र ते लग्न नाही टिकलं. लग्नाबद्दल करिश्माने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पाहूया करिश्माने नेमकं काय म्हटलं आहे.
    अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात मोठी लोकप्रियता मिळवली होती. करिश्माच्या चित्रपटां इतकीच चर्चा तिच्या लव्हलाईफची सुद्धा होतं होती. करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न होणार होतं. त्यांचा साखरपुडादेखील जाहीर करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी हे लग्न रद्द झालं होतं. त्यानंतर करिश्माने 2003 मध्ये व्यावसायिक संजय कपूरसोबत लग्नं केलं होतं. मात्र हे लग्न टिकू शकलं नाही. लग्नाच्या 11 वर्षानंतर या दोघांनीही घटस्फोट घेतला होता. मात्र घटस्फोटानंतर करिश्माने संजय कपूरच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. (हे वाचा: अबब! अल्लू अर्जुनच्या लेकीने घातला इतका महागडा ड्रेस; किंमत ऐकून व्हाल थक्क  ) करिश्माने घटस्फोटाच्या 4 वर्षानंतर एका वेबपोर्टलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने केलेले खुलासे ऐकून सर्वांना धक्काच बसला होता. करिश्माने म्हटलं होतं, ‘माझी सासू माझ्यावर हात उचलत होती. माझा नवरासुद्धा मला मारहाण करत होता. मी नेहमीच माझ्या जखमा माझ्या मेकअपखाली लपवण्याचा प्रयत्न करत असे. इतकचं नव्हे तर आमच्या हनिमूनवेळी त्याने त्याच्या मित्रांसोबत माझी बोली लावली होती. आणि मला त्यांच्यासोबत एकरात्र घालण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली होती. मात्र यासर्व गोष्टी जेव्हा माझ्या अवाक्याबाहेर गेल्या तेव्हा मी पोलिसांत तक्रार केली’. (हे वाचा: Yoga Day 2021: आलियाच्या हटके योगा पोझ; हा VIDEO एकदा पाहाच) रणधीर कपूर यांनीसुद्धा एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं, की संजय आणि करिश्माचं लग्न व्हावं अशीमाझी मुळीचं इच्छा नव्हती. तो कसा माणूस आहे,संपूर्ण दिल्लीला माहित आहे. आणि कपूर कुटुंबाला कोणाच्या पैशांच्या पाठीमागे पाळण्याची गरज नाहीय. कारण आमच्याकडे पैसाही आहे आणि कलासुद्धा. कारण कोर्टात संजयने असं म्हटलं होतं, की करिश्मा एक चांगली आई नाही. तिनं फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं.
    Published by:Aiman Desai
    First published: