Home /News /entertainment /

'या लोकांनी मारलं तिला'; प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

'या लोकांनी मारलं तिला'; प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने केला धक्कादायक खुलासा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री(Tv Actress) प्रत्युषा बॅनर्जीने(Pratyuha Banrjee Death) 2016 मध्ये या जगाचा निरोप घेतला होता.

    मुंबई, 22 जून- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) प्रत्युषा बॅनर्जीने (Pratyusha Banerjee Death) 2016 मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. प्रत्युषाच्या आत्महत्येने सर्वांनाचं हादरवून सोडलं होतं. तिला ‘बालिकावधू’ (Balikavadhu)  या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे तिच्या अशा निर्णयाने सर्वांनाचं धक्का बसला होता. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण बिग बॉस फेम विकास गुप्ताने एक आश्चर्यकारक खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. विकास गुप्ताने काही दिवसांपूर्वी खुलासा करत म्हटलं होतं, ‘मी आणि प्रत्युषाने काही दिवस एकमेकांना डेट केल होतं. आणि तिला ब्रेकअपनंतर समजलं होतं की मी बाय सेक्ष्युअल आहे. विकासच्या या खुलास्यानंतर सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहने या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. प्र्त्युषाने कधीही विकासला डेट केलं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येला जवळजवळ 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही त्याचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग हे प्रकरण बंद होण्याची वाट पाहात आहे. कारण त्याच्यावर अभिनेत्रीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र त्याने या आरोपांना खोडून काढत स्वतः ला निर्दोष म्हटलं आहे. तसेच त्यानं म्हटलं आहे, ‘प्र्त्युषाला मी नव्हे तर तिच्या आई वडिलांच्या लालसेने मारलं आहे. (हे वाचा:  HBD: या सुपरस्टारने चक्क आपल्या फॅनसोबत केलं आहे लग्न; पाहा विजयचे खास PHOTO) स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत राहुलने म्हटलं आहे, ‘मी विकास गुप्ता आणि काम्या पंजाबीविरुद्ध मानहानीची तक्रार करणार आहे. तसेच प्र्त्युषाला मी नव्हे तर तिच्या आईवडिलांच्या हव्यासाने मारलं आहे. त्यांच्या इतक्या मोठ्या आणि कधीही न संपणाऱ्या मागण्या होत्या. ती त्या पूर्ण नाही करू शकली. आणि तिने आत्महत्या केली’. असं राहुलने म्हटलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या