नुकताचं विराजसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला बालपणातील फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. विराजस हा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजसचा जन्म पुण्यामध्ये झाला आहे. अभिनयापूर्वी विराजसने आपलं शिक्षणही अगदी उत्तम पूर्ण केलं आहे. त्याने फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे.View this post on Instagram
त्यानंतर विराजने UPG कॉलेज मधून मास क्म्म्युनिकेशनकॅ शिक्षण घेतलं आहे. त्याने मास मीडियामध्ये सुद्धापदवी घेतली आहे. विराजसला सुरुवाती पासूनचं अभिनयाची आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना तो नाटकांमध्ये भाग घेत होता. तिथूनचं तिच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला, असं म्हणायला काही हरकत नाही. (हे वाचा:‘मुस्लीम धर्मात मला...’; हिबानं सांगितलं रिलिविंग कपडे न घालण्याचं कारण ) विराजसने ‘कोन होईल मराठी करोडपती’ साठी कन्टेन्ट मॅनेजर म्हणून काम केलं आहे. विराजs आपल्या आईप्रमाणेच अभिनयसृष्टीत काहीतरी करू इच्छितात. विराजसने हॉस्टेल डेज, माधुरी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर अनात्म हे नाटक सुद्धा केल आहे. (हे वाचा: सुगंधा मिश्राला कपिल शर्मा शोमधून का केलं बाहेर?) विराजस सध्या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘माझा होशील ना’ मध्ये काम करत आहे. या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यातील सई आणि आदित्यची जोडी लोकांना मोठ्या प्रमणात पसंत पडत आहे. ही मालिका सध्याच्या सर्वात जास्त लोकप्रिय मालिकांमधील एक समजली जाते. यामध्ये विराजस सोबत सईच्या भूमिकेत गौतमी देशपांडे आहे. हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. विराजसच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबत नात्यात आहे. हे दोघेही सतत आपलं प्रेम व्यक्त करत असतात.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment