मुंबई, 4 मे : कोरोनाच्या (Coronavirus)दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांना बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शन मिळत नसल्यानं जीव गमवावे लागत आहे. अनेकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी विनंती करत आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नसल्याने मृत्यूही होत आहेत. देशातील या परिस्थितीवर अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, 'सध्या सोशल मीडियावर जायला आणि टीव्ही बघताना खूप विचित्र वाटतंय. देशातील ही गंभीर परिस्थिती पाहून जीव तुटतोय.'
शक्ती कपूर कोरोनामुळे सध्या घरीच आहेत. ते फारसे बाहेर जात नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं, की 'मागील वर्ष फारचं कठीण होतं. आता मरण जवळ आलंय. आधी लोक म्हणायचे की हा मरणार आहे, तो मरणारआहे, मात्र, यात 10 वर्ष निघून जायची. पण आता लोक माशांप्रमाणे मरताहेत. मृत्यू काय आहे? मरणं खूप सोप्पं झालंय. नुकतंच माझ्या एका मित्राच्या भावाला सकाळी रुग्णालयात नेलं होतं. मात्र, सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही कोणत्या गोष्टीचा अंदाज लावू शकत नाही, परिस्थिती हाताबाहेर जातेय,' असं ते म्हणाले.
शक्ती कपूर यांनी लसीचे दोन डोस घेतले असून ते लोकांना लसीकरणासाठी जागृत करत आहे. 'सध्याच्या कठीण काळात लस घेऊनच माणून सुरक्षित राहू शकतो' असंही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच शक्ती कपूर (Shakti Kapoor)यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor)भाऊ सिद्धांत कपूरने (Siddhant Kapoor)प्लाझ्मा डोनेट केला. श्रद्धाने सिद्धांतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचं आवाहन केलं.
अशा या परिस्थितीत अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहे. खेळाडू आणि बॉलिवूड स्टारदेखील लोकांची मदत करताना दिसत आहे. अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षभरापासून गरजुंना मदत करतोय. त्याने हजारो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं तसंच आताही वैद्यकीय उपचाऱांसाठी तो लोकांना मदत करत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाची लागण झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor