मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कंगनाचं समर्थन महामूर्खपणा, आता विक्रम गोखलेंबरोबर काम करणार नाही'; या निर्मात्याचा मोठा निर्णय

कंगनाचं समर्थन महामूर्खपणा, आता विक्रम गोखलेंबरोबर काम करणार नाही'; या निर्मात्याचा मोठा निर्णय

 एका मराठी निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही अशी घोषणा सोशल मीडियावरून केली आहे.

एका मराठी निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही अशी घोषणा सोशल मीडियावरून केली आहे.

एका मराठी निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही अशी घोषणा सोशल मीडियावरून केली आहे.

मुंबई, 17 नोव्हेंबर- भारताला स्वातंत्र्य भीकमध्ये मिळाले असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतमुळे (Kangana Ranaut) तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (vikram gokhale) यांनीही तिच्या विधानाचं समर्थन केलं. आता याच एका मराठी निर्मात्याने भविष्यात कधीही विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही अशी घोषणा सोशल मीडियावरून केली आहे. शाळा, फँड्री अशा गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते निलेश नवलाखा (Nilesh Navalakha) यांनी हा निर्णय घेतला आहे.

निलेश नवलाखा यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,मी विक्रम गोखले बरोबर काम केले आहे, कलाकार म्हणुन मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे परंतु त्यांनी कंगना रानावत जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा आहे. जे काही ते बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो व भविष्यात त्यांच्या बरोबर काम करणार नाही हे पण घोषीत करतो.

मराठी साहित्य मंडळाकडून विक्रम गोखलेंवर देशद्रोहा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन विक्रम गोखले यांनी केल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी साहित्य मंडळाने (Marathi Sahitya Mandal) देखील विक्रम गोखलेंवर देशद्रोहा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यासोबतच मराठमोळा गायक अवधूत गुप्तेने देखील विक्रम गोखलेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

काय म्हणाले होते विक्रम गोखले?

विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने काल, पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करणात आला होता. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणावतने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला.

वाचा : भारताविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्यानं वीर दासवर गुन्हा दाखल; दिलं स्पष्टीकरण

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होत. यावरून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

वाचा : धक्कादायक ! अभिनेता अनिकेत विश्वासरावने मारहाण केल्याचा पत्नीचा आरोप; छळ प्रकरणी तक्रार दाखल

कंगना नेमकी काय म्हणाली होती?

भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाले, असं कंगना रणावत म्हणाली होती. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या व वादंग निर्माण झाला. आता कंगनाच्या या वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने, नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे

First published:

Tags: Entertainment, Kangana ranaut, Marathi entertainment