जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / भारताविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल वीर दासवर गुन्हा दाखल; कॉमेडियननं आता दिलं स्पष्टीकरण

भारताविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल वीर दासवर गुन्हा दाखल; कॉमेडियननं आता दिलं स्पष्टीकरण

भारताविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल वीर दासवर गुन्हा दाखल; कॉमेडियननं आता दिलं स्पष्टीकरण

अमेरिकेतील (US) जॉन एफ केनेडी सेंटर (John F Kennedy Centre) फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये कॉमेडियन वीर दासने (Veerdas) सादर केलेल्या ‘टू इंडियाज’ या एकपात्री नाटकाने वादळ निर्माण केले आहे. भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी वीरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 नोव्हेंबर- अमेरिकेतील   (US)  जॉन एफ केनेडी सेंटर  (John F Kennedy Centre)  फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये कॉमेडियन वीर दासने   (Veerdas)  सादर केलेल्या ‘टू इंडियाज’ या एकपात्री नाटकाने वादळ निर्माण केले आहे. भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी वीरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. आशुतोष हे भाजप महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे कायदेशीर सल्लागार आहेत. मात्र, आपल्या एकपात्री प्रयोगाबद्दल स्पष्टीकरण देताना वीरने म्हटलं की, ‘आय कम फ्रॉम टू इंडिया’चा उद्देश भारताचा अपमान करण्याचा अजिबात नव्हता’.

जाहिरात

स्टँड-अप कॉमेडियन वीर दास, जो सध्या यूएसमध्ये आहे, त्याने वॉशिंग्टन डीसीमधील जॉन एफ केनेडी सेंटरमधील त्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ त्याच्या YouTube चॅनेलवर शेअर केला आहे. या 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये वीरने अमेरिकन लोकांसमोर भारतीय लोकांच्या कथित दुहेरी चारित्र्याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या ‘टू इंडियाज’ या कार्यक्रमात त्यांनी प्रदूषण, AQI, कोविड-19, सामूहिक बलात्कार, फटाके, शेतकरी आंदोलन या ज्वलंत समस्यांचा उल्लेख केला. यावेळी तो म्हणाला, ‘मी त्या भारतातून आलो आहे जिथे आपण दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री सामूहिक बलात्कार करतो’.या विधानानंतर मोठं वादळ निर्माण झालं आहे.

वीर दास यांच्या एकपात्री प्रयोगाला प्रचंड विरोध होत आहे. अधिवक्ता आशुतोष दुबे यांनी मुंबईत एफआयआर दाखल केला असून ट्विटरवर लिहिले की, ‘वीर दास यांनी अमेरिकेत भारताची प्रतिमा खराब केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून वीर दास यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वीरदासचं स्पष्टीकरण- वाद वाढत असल्याचे पाहून वीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, ‘देशाचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. परंतु सर्व समस्या असूनही आपला देश महान आहे याची आठवण करून देण्याचा माझा हेतू होता. व्हिडिओमध्ये एकाच विषयावर दोन भिन्न विचार असलेल्या लोकांबद्दल बोलले जात आहे. आणि हे कोणत्या प्रकारचे रहस्य नाही. जे लोकांना माहित नाही. लोक भारताकडे द्वेषाने नव्हे तर आशावादी नजरेने पाहतात. लोक भारताचे कौतुक करतात, आदर देतात आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे. मी या अभिमानाने जगतो’.

जाहिरात

सोशल मीडियावर वीर दासच्या या एकपात्री नाटकावर लोकांची वेगवेगळी मते असली तरी. काही जण समर्थनार्थ बोलत आहेत तर काही जण याला देशविरोधी चाल म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात