फत्तेशिकस्तमधून दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं भारतातलं पहिलं सर्जिकल स्ट्राइक

फत्तेशिकस्तमधून दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं भारतातलं पहिलं सर्जिकल स्ट्राइक

अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राइकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

  • Share this:

'फर्जंद'चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून आकारास आलेल्या 'फर्जंद'ने तिकीटबारीचे मैदान मारत हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवली होती. 'फर्जंद' नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशलयुद्धनीतीचे दर्शन घडविणारा 'फत्तेशिकस्त' लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार असून पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे. लवकरचा या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Hook Up Song : आलिया- टायगरचा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल

कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्याभल्या शत्रूंवर मोठ्या चलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहीम फत्ते केली. आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्तेकेलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राइकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'फत्तेशिकस्त' या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारे आपल्याला अशाच एका अतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.

रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी 'फत्तेशिकस्त'च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट- मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनीसुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा

असं म्हणतात की सूकर भविष्यासाठी भूतकाळाची पानं उलगडणं गरजेची असतात. इतिहास हा असा दुवा आहे जो आपल्याला तत्कालीन घटनांशी जोडून ठेवतो आणि हा दैदिप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजरामर पराक्रमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशाचएका शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राइकची आठवण करून देणारा 'फत्तेशिकस्त' आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतोय.

अखेर सलमान कतरिनाला म्हणाला, ‘बन जा मेरे इश्क की चाशनी’

SPECIAL REPORT : जगातील मोस्ट वाँटेड जिंवत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 07:54 AM IST

ताज्या बातम्या