मुंबई, 17 जून : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन आज, 17 जूनला भेटीला आहे. सर्वांना यंदाचा सीजन कसा असणार, यात स्पर्धक कोणकोण असणार याची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे यंदाचा सीजन करण जोहर नाहीतर सर्वांचा लाडका भाईजान सलमान खान करणार आहे. त्यामुळे सलमानाप्रेमी खूपच उत्सुक तर आहेच पण तितकेट अतुर देखील आहे. अशातच यंदा या सीजनमध्ये मराठमोळी अभिनेत्री सहभागी होणार आहे. जिनं रितेश देशमुखसोबत यापूर्वी काम केलं आहे. ही अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही अभिनेत्री रितेश देशमुखसोबत वेड सिनेमात दिसली होती. आता सगळ्यांनी या अभिनेत्रीला ओळखळं असेल. ही अभिनेत्री जिया शंकर आहे. जिया रितेशसोबत वेड सिनेमात दिसली होती. आता जिया बिग बॉसला वेड लावायला सज्ज झाली आहे. वाचा- शाहरुखपेक्षा प्रभास ठरला ‘बाहुबली’; Adipurushने पहिल्या दिवशी किती कमावले? रिअल लाईफमध्ये जिया स्वत:ला फिट ठेवते. ती डाएट पॅटर्न फॉलो करते व खास एक्सरसाईज देखील करते. ती स्ट्रेचिंग एक्सरसाईज, डान्स एक्सरसाईज नियमितपणे करते. बिग बॉसच्या घरात आता जिया स्वत:ला कशी फिट ठेवते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
जिया शंकरने वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिचा जन्म मुंबईमद्ये 17 एप्रिल, 1995 रोजी झाला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 2013 मध्ये entha andanga unave या तेलुगू चित्रपटातून केली. जियासोबत Ajay आणि Gundu Hanumantha Rao हे साऊथ कलाकारही दिसले होते. तिने काही तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे. जिया 2014 मध्ये लव्ह बाय चान्स सीझनमध्ये ती दिसली होती. यामध्ये शिवांगी जोशी, बरखा सिंह, कवि शास्त्रीदेखील होते.2015 मध्ये क्वीन है हम या मालिकेत दिसली. 2022 मध्ये पिशाचिनी या मालिकेतती मुख्य भूमिकेत होती. यामध्ये तिची पवित्रा ही भूमिका होती. हर्ष राजपूतची भूमिकाही यामध्ये होती.‘मेरी हानिकारक बीवी’ ही तिची हिंदी मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत ता डॉक्टरची भूमिका साकारताना दिसली होती.
‘बिग बॉस’ची टीम प्रत्येकवेळी काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असते. यंदा या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून यामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि स्टार्स स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा सेट स्पर्धकांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी एखाद्या सरप्राईज पॅकेजपेक्षा कमी नाही, ज्यात प्रत्येक रूम एक वेगळी गोष्ट सांगताना दिसत आहे.‘बिग बॉस ओटीटी 2’चा सेटचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते की, यंदा स्पर्धकांसमोरील आव्हाने पूर्वीपेक्षा अधिक कठीण असतील.‘बिग बॉस ओटीटी 2’च्या घरातील फोटोंमुळे प्रेक्षकांची या शोबद्दलची उत्सुकता आधिक वाढली आहे.शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान म्हणताना दिसत आहे, ‘मी येतोय, बिग बॉस ओटीटीवर. ‘बिग बॉस ओटीटी 2’ 17 जूनपासून ग्रँड ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे.‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीजन करण जोहरने होस्ट केला होता, ज्याची विजेती दिव्या अग्रवाल झाली.