बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा 16 जून रोजी संपूर्ण देशात रिलीज झाला आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी पहिल्या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अभिनेता प्रभास, कृती सेनन, देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. अनेक दिवस सिनेमा चर्चेत होता.
मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेनं या हनुमानाची भुमिका साकारली आहे. या भुमिकेला त्यानं पुरेपूर न्याय दिल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे त्याच्या डायलॉगवर चांगलीच टीका करण्यात आली आहे.
प्रभास हा बाहुबली सिनेमातून बाहेरच आलेला नाही अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे. तर कृती सेनन फक्त स्क्रिन सुंदर दिसतेय असं म्हटलं जात आहे.
तर सैफ अली खाननं साकारलेल्या रावणाच्या भुमिकेवर सर्वाधिक टीका करण्यात येत आहे. रावणाच्या दहा डोक्यांवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.
आदिपुरूषच्या केवळ फक्त VFX साठी 250 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात सिनेमा पाहताना VFX प्रेक्षकांची घोर निराशा करतोय.
सिनेमातील कलाकारांचा अभिनय, डायलॉग, VFX या हे सगळं प्रेक्षकांच्या फारसं पचनी पडल्याचं दिसून येत नाहीये.
सिनेमाच्या रिलीजआधी आणि रिलीजनंतर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता सिनेमानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नक्की काय कामगिरी केली हे पाहूयात.
पहिल्या दिवशी सिनेमानं 95 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. सिनेमानं हिंदी भाषेत 34-38 कोटी कमावलेत. तर तेलुगू भाषेत 52 कोटींचं कलेक्शन झालंय.
वर्ल्ड वाईल्ड सिनेमानं 140 कोटी कमावलेत. त्यामुळे बाहुबली प्रभास हा शाहरूखच्या पठाणवर भारी पडला आहे. पठाणनं पहिल्या दिवशी 105.09 कोटी कमावले होते.