मुंबई, 10 जानेवारी: सैराट चित्रपटातून तरुणांच्या हृदयात आणि लोकांच्या घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू आपल्या अभिनयानं लोकप्रिय ठरली. सैराट, कागर सारख्या चित्रपटांनंतर आता वेगळ्या धाटणीचा चित्रपटातू रिंकू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सैराट सिनेमानं रिंकूला पैसा, प्रसिद्धी, सन्मान मिळवून दिलं. आर्ची म्हणून तिने तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. इतक्या सगळ्या गोष्टींनंतर आता प्रश्न पडला असेल की ती एका चित्रपटासाठी मानधन किती घेते. वयानं लहान असलेली रिंकू मानधनाच्या बाबतीत तर रिंकू बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना पाहायला मिळते. रिंकूचं मानधन ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
रिंकू राजगुरुचा मेकअप नावाचा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटासाठी रिंकून जवळपास 27 लाख रुपयांचं मानधन घेतल्याची माहिती आहे. वयानं लहान असलेल्या रिंकूनं सैराट आणि कागर चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळवली. त्यामुळे निर्मात्यालाही वाढीव मानधन देणं फायद्याचं ठरणार असल्यानं त्यांनीही कोणतेही आढवेढे घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत महागडी अभिनेत्री असल्याची चर्चा आहे. एका चित्रपटासाठी 27 लाख रुपयांचं मानधन घेणारी रिंकू आता मेकअप चित्रपटातून आपल्या भेटीला येत आहे.
तिच्यासोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट प्रेम, मुलीचं स्वातंत्र्य आणि लग्न अशा सगळ्या गोष्टींवर आधारित आहे. या चित्रपटात रिंकूचा एक आगळावेगळा लूक आणि अभिनय पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा-डोंबिवलीकर अक्षया अय्यर ठरली ‘सूर नवा ध्यास नवा'ची राजगायिका!
हेही वाचा-सलमान मध्यरात्री जायचा शिल्पाच्या घरी, अभिनेत्रीनं सांगितलं धक्कादायक कारण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi film, Rinku rajguru