मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अनन्या पांडेनं केलं बाप्पाचं स्वागत! पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली खूपच सुंदर

अनन्या पांडेनं केलं बाप्पाचं स्वागत! पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली खूपच सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) अनन्या पांडेच्या(Ananya Pandey) घरीसुद्धा लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) अनन्या पांडेच्या(Ananya Pandey) घरीसुद्धा लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) अनन्या पांडेच्या(Ananya Pandey) घरीसुद्धा लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.

मुंबई, १० सप्टेंबर- 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...,च्या गजरात घरा घरात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाच गणेशोत्सवाचे (Ganesh Chaturthi 2021) खास आकर्षण असते. गणेशोत्सव सुरु होण्याच्या काही दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. गणेशोत्सवाने वातावरणात एक सकारत्मकता निर्माण झालेली पाहायला मिळते. त्यामुळेच सर्वांना गणेशोत्सवाचं आकर्षण असतं. बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) अनन्या पांडेच्या(Ananya Pandey) घरीसुद्धा लाडका बाप्पा विराजमान झाला आहे.

सर्वसामान्य लोकांप्रमाणे कलाकारांच्या घरीसुद्धा गणरायाचं आगमन झालं आहे. अनेक कलाकारांनी खास शूटिंगमधून वेळ काढून घरी बाप्पा विराजमान केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीसुद्धा गणराया विराजमान झाला आहे. नुकताच अभिनेत्री अनन्या पांडेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेयर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(हे वाचा:स्वप्नील जोशी ते वीणा जगताप या कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन)

अभिनेत्री अनन्या पांडेने शेयर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घरी गणराया अगदी थाटामाटात विराजमान झालेला दिसत आहे. अनन्या बाप्पाच्या शेजारीच हात जोडून उभी आहे. यावेळी अनन्याने पिवळ्या रंगाचा सुंदर असा पारंपरिक कुर्ता सलवार परिधान केला आहे. या सिम्पल लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

(हे वाचा:रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी...' माधुरीसोबत जॅकलिन आणि यामीची ठसकेबाज)

लवकरच अभिनेत्री अनन्या पांडे 'लायगर' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अनन्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Ananya panday, Ganesh chaturthi