मुंबई, 11 सप्टेंबर- गणरायाला (Ganesh Chaturthi 2021) सर्वांचं लाडकं दैवत म्हणून ओळखलं जात. सर्वांना बाप्पा हवाहवासा, आपलासा वाटतो. त्याच्या येण्याने सर्व विघ्न दूर होतात म्हणूनच त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणतात. तसेच गणपतीला बुध्दिचा देवतादेखील म्हटलं जात. मग ते खेळ असो वा अन्य काही सर्वांमध्ये मेहनतीसोबत बुद्धीचा वापर केल्याने हमखास यशप्राप्ती होते. म्हणून तर यावर्षी ऑलम्पिकमध्ये आपल्या लाडक्या खेळाडूंनी पदक जिंकत आपली छाती अभिमानाने फुलवली आहे. म्हणून या खेळाडूंना सन्मान देत अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) बाप्पाची आरास सजवली आहे.
१० सप्टेंबरपासून यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल घरोघरी अगदी उत्साहात बाप्पाचं आगमन झालं आहे. सर्वांनी बाप्पाच्या येण्याआधीच तयारीला सुरुवात केली होती. प्रसादापासून ते गणरायाच्या आरसापर्यंत सर्वकाही भक्तांनी अगदी चोखपणे केलं आहे. यामध्ये कलाकारांचासुद्धा समावेश आहे. अभिनेता सुबोध भावेच्या बाप्पाची आरास यावेळी खूपच खास आहे. सुबोधने आपलं दैवत आणि आपल्या देशाचा अभिमान एकत्र आणला आहे. (हे वाचा: ‘उगवली शुक्राची चांदणी…’; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर खिळल्या चाहत्यांच्या न ) अभिनेता सुबोध भावेनं आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या घरच्या बाप्पाचा फोटो शेयर केला आहे. यामध्ये बाप्पाची आरास अगदी खास आणि वेगळी दिसत आहे. कारण सुबोधने आपल्या लाडक्या गणरायाची आरास यावर्षीच्या ऑलम्पिक खेळाडूंच्या छायाचित्रांनी सजवली आहे. नीरज चोप्रापासून इतर सर्वच खेळाडू या आरासमध्ये असलेले दिसत आहेत. बाप्पाची हि आरासपाहून कोणालाही अभिमान वाटावा अशीच आहे. (हे वाचा: नाईकांच्या वाड्यात बाप्पा झाले विराजमान; मात्र आनंदात येणार दत्ता नावाचं विघ्न ) सुबोध भावेने शेयर केलेल्या या फोटोवर प्रचंड कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. सर्जन सुबोधच्या या आगळ्या वेगळ्या कल्पनेचं तोंडभरून कौतुक करत आहेत. तसेच त्याला शुभेच्छादेखील देत आहेत. सुबोधनेसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पासोबत फोटो शेयर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.