गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक मराठमोळी अभिनेत्री पारंपरिक वेशभूषेत दिसून येत आहे. नुकताच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रार्थना लाल रंगाच्या काठपदर साडीमध्ये दिसून येत आहे. प्रार्थना खास गणेशोत्सवानिमित्त इतकं सुंदर तयार झाली आहे. फोटोमध्ये प्रार्थनाची लाल साडी, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात ठुशी अशा अंदाजात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रार्थनाच्या या लूकवर चाहत्यांना नजरा खिळल्या आहेत. त्याच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. सध्या प्रार्थना 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेमध्ये झळकत आहे. या मालिकेत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी तिने हा साजशृंगार केला आहे.