मुंबई, 15 नोव्हेंबर : मराठमोळी अभिनेत्री खशबू तावडे**(Khushbu Tawade)** हिने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. खशबू आणि तिचा पती अभिनेते संग्राम साळवी (Sangram Salvi) हे दोघे आई-बाबा झाले आहेत. यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. खुशबुने मुलाला जन्म दिला आहे. 2 नोव्हेंबर 2021 रोजी तिने बाळाला जन्म दिला असून त्याच नाव राघव असल्याचं तिने सांगितलं आहे. तिनं इन्स्टावरून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. मुलाच्याया हाताचा फोटो तिनं शेअर केला आहे. यानंतर या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा : कंगनाच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची अशी होती प्रतिक्रिया खशबू तावडेच्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खूप थाटात तिचं डोहाळे जेवण पार पडलं होते. सुंदर हिरवी साडी परिधान करून तिने साजशृंगार केला होता. यात खुषबुची बहीण अभिनेत्री तीतिक्षा तावडे (Teetiksha Tawde) देखील दिसत आहे. मावशी होणार असल्याने ती देखील आनंदी दिसत आहे. खुशबूने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. दोंघांच्याही चाहत्यांनी त्यांना भरघोस शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
2018 साली खुशबू आणि संग्राम यांनी विवाह केला होता. दोघांनीही अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. संग्राम देवयानी या मालिकेनंतर फारच प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे खुशबूने देखील या मालिकेत लहानस पात्र साकारल होतं. वाचा : राजकुमार राव - पत्रलेखाची लग्नपत्रिका झाली लीक, खूप खास आहे कार्ड आम्ही दोघी, तू भेटशी नव्याने, पारिजात, मेरे साई, तेरे बिन या मालिकांमध्ये खुशबू दिसली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत देखील तिने काही एपिसोड्स साठी काम केलं आहे. ‘लव्ह फॅक्टर’ या चित्रपटात देखील खुषबूने काम केलं आहे.