मुंबई 27 मे: मराठी अभिनेत्रींना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. वेगवेगळ्या आणि अत्यंत चांगल्या भूमिकांमधून आघाडीच्या अभिनेत्रींना बघून प्रेक्षकही बरेच खुश आहेत. फक्त वेबसिरीज किंवा चित्रपटच नाही तर हा ट्रेंड मराठी डेलीसोप मालिकांमध्येही पाहायला मिळतो आहे. त्याच त्या पद्धतीच्या भूमिकांपेक्षा आजच्या स्त्रीचं दर्शन घडवणाऱ्या भूमिका लोकप्रिय होत आहेत. हा ट्रेंड मालिकांमध्ये आत्ताचा नाहीये हे मात्र नमूद केलं पाहिजे. घरगुती स्त्रियांना आवडेल अशी संहिता असेल तरी मालिकेतील स्त्रिया या मुळूमुळू रडणाऱ्या न दाखवता कणखर आणि तितक्याच साध्या ही आहेत. काही वेळेला हे गणित बिघडत जरी असेल तरी आधीपासूनच उत्तम विषय आणि चांगल्या भूमिका मालिकांमधून दाखवल्या जात आहेत. बरेचदा मालिकेतील भूकिकांमुळे अभिनेत्रींना ओळखलं जातं. ही पात्रं प्रेक्षकांच्या एवढी जवळची होतात की त्यांना भूमिकेच्या नावाने ओळखलं जातं. असं असतानाही मराठीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी यशाच्या शिखरावर असताना करिअरला रामराम ठोकला. जाणून घेऊया यातील 4 अभिनेत्रींनबद्दल.
- नीलम शिर्के नीलम शिर्के (Neelam Shirke) हे नाव साधारण 10 वर्षांआधी प्रचंड लोकप्रिय होतं. नीलम झी मराठीवरील ‘वादळवाट’ या मालिकेत विशाखा या भूमिकेत झळकली होती. वादळवाटला मिळालेल्या घवघवीत यशाने नीलमची सुद्धा ओळख निर्माण झाली होती. नीलम त्यानंतर ‘असंभव’ या सुप्रसिद्ध मालिकेत सुलेखा या ग्रे शेडच्या भूमिकेत दिसली. अत्यंत वेगळा विषय असणाऱ्या असंभव मालिकेला तर लोकप्रियता मिळालीच शिवाय नीलमला सुद्धा तिच्या पात्रासाठी नावाजलं गेलं. गेल्या काही वर्षात नीलम मात्र इंडस्ट्रीपासून लांब आहे. तिने पुन्हा इंडस्ट्रीत यावं अशी तिच्या फॅन्सची इच्छा आहे. नीलम तिचे लाईफ अपडेट्स इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते.
- कादंबरी कदम कादंबरी कदमने (Kadambari Kadam)अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनय केला आहे. या गोजिरवाण्या घरात, अवघाची हा संसार अश्या मालिकांमधून तिने केलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. अवघाचि संसार मालिकेत साकारलेली अंतरा ही भूमिका अजूनही लोकांच्या लक्षात आहे. याशिवाय स्टार प्रवाहवरील ‘तुजविण सख्या रे’ या मालिकेत सुद्धा कादंबरी दिसली होती. कादंबरीने 2016 साली प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर अविनाश अरुण यांच्याशी लग्न केलं आणि आज तिला कार्तिक नावाचा मुलगा आहे. हे ही वाचा- ‘तमाशा लाईव्ह'15 जुलैला होणार प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार सांगितिक मेजवानी लग्न झाल्यावर कादंबरीने ब्रेक घेतला आणि आता ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. तिला लवकरच नव्या भूमिकेत बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
- मृणाल दुसानिस मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. झी मराठीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मृणालच्या करिअरची दमदार सुरवात झाली. त्यानंतर ‘तू तिथे मी’ ‘हे मन बावरे’ अश्या मालिकेत तिने केलेल्या भूमिका गाजल्या. तिला अनेक अवॉर्ड्सदेखील मिळाले. नीरज मोरेशी विवाहबद्ध झाल्यवर तिने करिअरमधून ब्रेक घेतला. ती आता अमेरिकेला स्थायिक झाली आणि तिने नुकत्याच गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
- नेहा गद्रे नेहा गद्रे (Neha Gadre) या अभिनेत्रीने स्टार प्रवाहवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिला झी मराठीवरील ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकेमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. नेहाने अचानक करिअरमधून ब्रेक घेतला. त्यानंतर ती कोणत्याच मालिकेत दिसली नाही.