जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सर्व कुटुंबाला न्यायलयीन कारवाहीला तोंड द्यावे...' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'सर्व कुटुंबाला न्यायलयीन कारवाहीला तोंड द्यावे...' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'सर्व कुटुंबाला न्यायलयीन कारवाहीला तोंड द्यावे...' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

मराठीतील ही लोकप्रिय अभिनेत्री आई झाल्याापासून सोशल मीडियावर नेहमीच तिच्या आईपणाबद्दल माहिती, अनुभव शेअर करत असते. तिनं नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जून- मराठोमोळी अभिनेत्री आणि लोकप्रिय यूट्यूबर उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. उर्मिलाने ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. तिने तिच्या मुलासोबत काही गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्मिला आई झाल्यापासून सतत काहींना मुलाबद्दल असेल किंवा आईपणाबद्दल शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे, जो फक्ता तिच्या टिप्ससाठी तिला फॉलो करतो. नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे उर्मिला चर्चेत आली आहे. उर्मिलाने तिचा गोंडस मुलगा अथांग याच्यासोबत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. आई आणि लेकाची जोडी खूपच छान दिसत आहे. तिनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, कोलाड येथे शनिवारी उन्मनीच्या बर्थडे पार्टीत, अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आणि तिचं गोंडस बाळ, अथांग लाल रंगाचे कपडे घालून मजा लूटताना पकडले गेले. पार्टीमधे चक्क डाएट तोडून केक खाताना उर्मिला सापडली. तिच्या चेहऱ्यावर कसलेही अपराधीपणाचे भाव नव्हते. या पार्टीत पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर उन्मनीसाठी भरभरुन आशिर्वाद देताना समोर आले. पोलिसांच्या उपस्थितीत संपुर्ण कुटुंब रींगा रींगा रोजेस गाण्यावर थिरकताना मिळाले. We all fall down अशा गाण्यातील ओळीवर चक्क पार्टीतील सर्व मंडळी फर्शीवर पडलेल्या अवस्थेत मिळाली. फ्रोजन थीमच्या केकसहित, पार्टीत कोकम सरबताच सेवन चालू असल्याचे सुत्रांनी सांगितले. वाचा- …आणि मराठी अभिनेत्रीचा फोटो बघून चाहत्याला झाली थेट पाकच्या भुट्टोंची आठवण सुमारे संध्याकाळी ६ च्या दरम्यान पार्टी सुरु होऊन चक्क रात्री ९ वाजे पर्यंत चालली. पारंपरिक वाढदिवसाचे सर्व नियम मोडून सद्गुरूंचे ग्रंथ वाटप, भलं करची साधना आणि प्रार्थनेच्या घोषात आनंद लूटल्याच्या प्रकरणी सर्व कुटुंबाला न्यायलयीन कारवाहीला तोंड द्यावे लागेल, अशी सुत्रांकडून माहिती मिळाली. वाचा- ‘चंद्रा’वानी फुललं अमृता खानविलकरचं रूप, ‘चंद्रमुखी’चा व्हाईट साडी लुक घालतोय धुमाकूळ उर्मिलाची ही पोस्ट बर्थडे पार्टीबद्दल आहे. या पार्टीत सर्व कुटुंबाने कशी धमाल केली याबद्दल तिनं माहिती सांगितली आहे. तिचा भाऊच पोलीस अधिकारी असल्याने त्याचे वर्णन पोलिसी भाषेत केले आहे, त्यामुले पोस्ट चर्चेत आहे.

जाहिरात

उर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने दुहेरी, एक तारा, दिया और बाती या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिला प्रेग्नेंट होती तेव्हा अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यासोबतच डोहाळे जेवणाचे अनेक फोटो व एक छानसा व्हिडीओ देखील तिन सोशल मीडियावर शेअर केला होता. उर्मिलाला उर्मिलाला सर्वजण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतात मात्र ती एक मराठीमधील प्रसिद्ध अशी युट्यूबर देखील आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर ती ब्यूटी, लाईफस्टाईल अशा विविधा विषयावर माहिती शेअर करत असते व काही टिप्स देखील देत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात