मुंबई, 7 जून- मराठी अभिनेत्रींचा ( marathi actress )सोशल मीडियावर वावर वाढला आहे. अनेक अभिनेत्री त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकताच मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहत्यांला पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टोंची( benazir bhutto ) आठवण झाली आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची ( surekha kudachi ) या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्या नेहमीच त्यांचे फोटो शेअर करत असतात. शिवाय त्यांच्या कामाच्या अपडेट देखील त्या शेअर करत असतात. त्यांनी नुकताच त्यांचा एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. डोक्यावर ओढणी आमि डोळ्यावर ग्लालेस असा काहीसा त्यांचा फोटो आहे. त्यांचा हा लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याला तर त्यांचा हा फोटो पाहून पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टोंची आठवण झाली आहे. त्याने तशी कमेंट देखील केली आहे. वाचा- आर माधवनला होतं हे टेन्शन, म्हणून लगेच दिला होकार, खास दिवशी शेअर केलं सिक्रेट सुरेखा कुडची यांच्या फोटोवर नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, आपला फोटो पाहिला आणि पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची आठवण झाली. खूप छान फोटो. 👌👌..अशी काहीशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. सध्या हा फोटो आणि कमेंट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. सुरेखा यांनी या फोटोला सुंदर कॅप्शन दखील दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माचिस तो यू ही बदनाम है हुजूर , हमारे तेवर तो आज भी आग लगाते है ।
सुरेखा कुडची नुकत्याच “तुझ्या रूपाचं चांदण” या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेत त्यांनी महेश्वरी पाटीलची भूमिका साकारली होती. याला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाय रानबाजार सीरीजमधील त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. शुटींग या सगळ्यातून वेळ काढत त्यांनी देवदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील होती. यापूर्वी बिग बॉस विजेता विशाल निकम, विकास पाटील यांनी देखील जोतिबाचं दर्शन घेतलं आहे.
अभिनेत्री सुरेखा कुडची या 1990 पासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमा, मालिकांतही काम करत लोकप्रियता मिळवली आहे. मराठी सिनेमांमध्ये सासुची माया, पोलिसाची बायको, भरत आला परत, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीण यांचा समावेश आहे. आता पर्यंत त्यांनी ५० मराठी आणि हिंदी सिनेमांत काम केले आहे.याशिवाय देवयानी, रुंजी, नवरी मिळे नव-याला, चंद्र आहे साक्षीला यासारख्या मालिकांतही त्यांनी काम केले आहे.