अमृता खानविलकर अजूनही चंद्राच्या आठवणीत आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटो मुळे चंद्रमुखीच्या fever मधून तिची सुटका झालेली नाही हे समजत आहे चंद्रासारख्या शंभर पांढऱ्या रंगाच्या साडीतले तिचे फोटो खूप viral होताना दिसत आहेत. चंद्रमुखीच्या काळात तिने साडीमध्ये केलेले अनेक फोटोशूट गाजले होते. या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये सुद्धा ती अप्रतिम दिसत आहे. ‘एक लाजरा साजरा मुखडा चंद्रावानी भुलला गं’ अशी कॅप्शन देत तिने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. तिच्या आयफा लुकची सुद्धा खूप चर्चा झाली होती. आयफा मधल्या तिच्या आऊटफिटने सुद्धा तिने अनेकांना घायाळ केलं आहे. तिचा निळा ड्रेस परिधान केलेला एक आऊटफिट चाहत्यांना पसन्त पडला होता. अमृताने याआधी सुद्धा पांढऱ्या साडीमध्ये खूप सुंदर फोटोशूट केलं होतं.