Home /News /entertainment /

वडिलांच्या आठवणीत तेजस्विनीची भावनिक पोस्ट; दोन प्रिय वस्तूंची सांगितली खास आठवण

वडिलांच्या आठवणीत तेजस्विनीची भावनिक पोस्ट; दोन प्रिय वस्तूंची सांगितली खास आठवण

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तेजस्विनीने तिच्या वडिलांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एक खास आठवण सांगितली आहे.

  मुंबई, 28 नोव्हेंबर - मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित   (tejaswini pandit ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तेजस्विनीचे वडील रणजित पंडित यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आज त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तेजस्विनीने तिच्या वडिलांची खास आठवण सांगितली आहे. एक भावनिक पोस्ट लिहून  दोन चमचे असलेले फोटो शेअर केले आहेत. तेजस्विनी पंडितने इन्स्टावर बाबांसोबत तिच्या दोन प्रिया गोष्टींचा फोटो शेअर केला आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला अनेकांनी विचारलं तुझं prized possession काय आहे.....?!घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स,soft toys की आणखी काही.....काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल...!तर ह्या त्या 2 गोष्टी आहेत.माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं....बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला Cook होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला.... हे 2 चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा catering student आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हा बहिणींना चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो. आणि तो perfect लागतो असं मला वाटतं. वाचा : Salman Khan च्या फॅन्सनी ओलांडली मर्यादा, Antim पाहिल्यानंतर सिनेमागृहात केला विचित्र प्रकार; Video शेअर करत सलमान म्हणाला... त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे . पण आजतागायत तो चमचा कधी replace झाला नाही. कारण स्वयंपाकातील "प्रमाण" ह्याचं आमच्या घरी जाम महत्व.... हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या , शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं "प्रमाणाबाहेर" प्रेम आहे. तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य !
  आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबाचे खूप photos नाहियेत आमच्याकडे. कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने exit घेतली.आजही तुला तितकंच miss करतो आम्ही बाबा !जिथे कुठे असशील, देव बरे करो...Happy Birthday Baba 🌻 I Love You ❤, अशी काहीशी भावनिका पोस्ट तिनं लिहिली आहे. वाचा : जाह्नवी कपूरचे मेकअप आर्टिस्टसोबत जोराचे भांडण; अर्जुन कपूरची अशी होती प्रतिक्रिया अग्गबाई अरेच्चा! या चित्रपटातून खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री तेजस्वनी पंडित पुढे जाऊन मराठी सृष्टीतील मुख्य नायिका बनली. तिची आई ज्योती चांदेकर पंडित या देखील अभिनेत्री आहेत. सिंधुताई सपकाळ या चित्रपटात दोघी मायलेकींनी मुख्य भूमिका साकारलेली  होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tejaswini pandit

  पुढील बातम्या