मुंबई 15 मे: माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. 90 च्या दशकांत तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ होती. केवळ तिची एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये गर्दी करत असे. अशा या नामांकित अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Madhuri Dixit Birthday) माधुरीला बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ (dhak dhak girl madhuri dixit) म्हणून ओळखतात. खरं तर धक धक या गाण्यामुळं तिला ही ओळख मिळाली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे गाणं तिच्यासाठी लिहिलेलंच नव्हतं. दुसऱ्या एका अभिनेत्रीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला परिणामी त्याठिकाणी माधुरीची वर्णी लागली. अन् या गाण्यानं तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं...
1991 साली बेटा या चित्रपटाची निर्मिती केली जात होती. या चित्रपटात अनिल कपूर-श्री देवी यांची सुपरहिट जोडी झळकावी अशी दिग्दर्शक इंद्रकुमार यांची इच्छा होती. पण श्रीदेवीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण सतत ती अनिल कपूर यांच्यासोबतच काम करत होती. आता तिला दुसऱ्या कलाकारांसोबत काम करायचं होतं. इंद्रकुमार यांनी कित्येकदा विनंती करुनही ती ऐकली नाही. परिणामी त्या ठिकाणी माधुरी दीक्षितची वर्णी लागली. माधुरीने इंद्रकुमार यांची ऑफर स्वीकारली. ‘बेटा’ चित्रपट सुपरहिट झाला आणि यासोबतच माधुरीचं ‘धक धक’ गाणंही सुपरहिट ठरलं.
माधुरीला आठवलं ते गाणं; सरोज खान यांच्या आठवणीनं कोसळलं रडू
हे गाणं अत्यंत बोल्ड असल्याचं त्यावेळी म्हणण्यात आलं होतं. सेन्सॉर बोर्डानेही गाण्यावर आक्षेप घेतला होता. गाणं शूट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ ठेवण्यात आला होता, पण फक्त तीन दिवसांत गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं. सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं शूट करण्यात आलं. माधुरीला ‘बेटा’ चित्रपटासाठी त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अन् तिथूनच चित्रपटात काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेली माधुरी एकाएकी सुपरस्टार झाली. तिची तुलना थेट श्री देवीशी केली जाऊ लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Madhuri dixit