मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ती सध्या काय करतेय? बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती ट्विंकल खन्नाची बहिण

ती सध्या काय करतेय? बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती ट्विंकल खन्नाची बहिण

रिंकीने 1999 साली ‘प्यार मे कभी कभी’ (Pyar me kabhi kabhi)  या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रिंकीचं फिल्मी करिअर अवघं 4 वर्षांचं होतं. या चार वर्षातही तिने 9 चित्रपटांत काम केलं आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 14 मे : अभिनेत्री ट्विंकल खन्नाची (Twinkle Khanna) बहिण म्हणजेच पूर्व अभिनेत्री रिंकी खन्नाने (Rinki Khanna) अचानक चित्रपटांमधून एक्झिट घेतली होती. तर त्यानंतर ती कधीही चित्रपटसृष्टीकडे वळली नाही. ती कायमच लॅमलाईटपासून दूर राहिली आहे. राजेश खन्ना यांची दुसरी मुलगी म्हणजेच रिंकी, रिंकीचं खरं नाव रिंकल खन्ना असं आहे. रिंकीने 1999 साली ‘प्यार मे कभी कभी’ (Pyar me kabhi kabhi)  या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

त्यानंतर तिने आणखी काही चित्रपटातही काम केलं होतं. पण त्यानंतर ती सिनेसृष्टीपासून कायमची लांब गेली. तर तिने परत कधीच या क्षेत्राकडे वळूनही पाहिलं नाही. रिंकीचं फिल्मी करिअर अवघं 4 वर्षांचं होतं. या चार वर्षातही तिने 9 चित्रपटांत काम केलं आहे.

या गोष्टीला आता 17 वर्षे उलटली आहेत. या 17 वर्षांत रिंकीने कधीही पुनरागमन करण्याचाही प्रयत्न केला नाही. तर सध्या ती अतिशय साधं सरळ जीवन जगत आहे. याशिवाय ती कधीच सोशल मीडियावरही सक्रिय दिसली नाही. रिंकी आता 43 वर्षांची आहे. तर तिचा सुखाचा संसार सुरू आहे. तिला एक 17 वर्षांची मुलगी आहे. व एक 8 वर्षांचा मुलगा.

फिटनेस फ्रिक मिलिंद सोमणनं मारले 6 बोटांवर पुलअप्स; पाहा अभिनेत्याचा थक्क करणारा वर्कआउट

2004 साली रिंकीने चित्रपटसृष्टीला राम राम करत उद्योजक समीर सरन याच्याशी विवाह केला.

तर त्यानंतर ती लंडन ला स्थाईक झाली. तर सध्या रिंकी सामान्य महिलेप्रमाणे घर, कुटुंब, संसार सांभाळत आहे. रिंकीची मुलगी नाओमिका काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. तर ती चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतं आहे. अनेकदा अक्षय कुमार कुटुंब आणि रिंकीचं कुटुंब एकत्र स्पॉट होतात.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment, Twinkle khanna