मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /World Bicycle Day 2021: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं सायकलच महत्व

World Bicycle Day 2021: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं सायकलच महत्व

मराठी अभिनेत्री(Marathi Actress)  सोनाली कुलकर्णीने(Sonali Kulkarni)  जागतिक सायकल दिवसाच्या(World Bicycle Day) शुभेच्छा देत, एक खुपचं चांगला संदेश इतर लोकांना दिला आहे

मराठी अभिनेत्री(Marathi Actress) सोनाली कुलकर्णीने(Sonali Kulkarni) जागतिक सायकल दिवसाच्या(World Bicycle Day) शुभेच्छा देत, एक खुपचं चांगला संदेश इतर लोकांना दिला आहे

मराठी अभिनेत्री(Marathi Actress) सोनाली कुलकर्णीने(Sonali Kulkarni) जागतिक सायकल दिवसाच्या(World Bicycle Day) शुभेच्छा देत, एक खुपचं चांगला संदेश इतर लोकांना दिला आहे

मुंबई, 3 जून-  मराठी अभिनेत्री (Marathi Actress) सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) जागतिक सायकल दिनाच्या (World Bicycle Day) शुभेच्छा देत, एक खुपचं चांगला संदेश इतर लोकांना दिला आहे. सोनालीने आपला खुपचं सुंदर सायकलवरील फोटो शेयर केला आहे. तसेच कॅप्शन देत सायकल फेरफटका आणि थोडी रोजची खरेदी असं तिनं म्हटलं आहे. सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून तिचं कौतुक होतं आहे.

आज जागतिक सायकल दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक लोक आपल्या पद्धतीने सायकलिंगचे फायदे सांगत आहेत. सायकलमुळे आरोग्य तर उत्तम राहतेच शिवाय जवळपासची हलकीफुलकी कामेसुद्धा पटकन होतात. आज जागतिक सायकल दिवसाच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या सायकलसोबतचा आपला फोटो शेयर करत, सायकलचं महत्व सांगिलत आहे.

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीने आपला एक सुंदर फोटो शेयर करत म्हटलं आहे, ‘एक 50 मिनिटांची सफर आणि सोबतचं थोडी घरगुती खरेदी, तसेच सोनालीने मी स्वतःचं साहित्य स्वतः आणते याबद्दल अभिमान असल्याचंही म्हटलं आहे’.

(हे वाचा: World Bicycle Day 2021: काजोलने दिल्या अनोख्या शुभेच्छा, शेयर केला मजेशीर VIDEO)

सोनालीच्या या पोस्टवर चाहते तिची तोंडभरून स्तुती करत आहेत. सोनाली मराठी चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री समजली जाते. तिच्या खणखणीत अभिनयावर सर्वच फिदा आहेत.  सोनाली नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत आली आहे. आपल्या अभिनयातून तिने आपली क्षमता दाखवून दिली आहे.

(हे वाचा:कोरोनामुक्त होताच 10 हजार किलोमीटर धावले मिलिंद सोमण, पाहा PHOTO  )

सोनालीने फक्त मराठीमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे. सध्या सोनाली सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी विविध गोष्टी शेयर करत असते. चाहतेसुद्धा तिला तितकचं प्रेम देत असतात.

First published:

Tags: Marathi entertainment, Sonali kulkarni