अभिनेता मिलिंद सोमण नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. या वयातही त्याचा फिटनेस एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. मिलिंद सतत एक्सरसाईज करताना दिसून येतो. तो सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. सतत तो आपले फिटनेस व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असतो. नुकताच मिलिंद यांनी इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो पोस्ट करत एक महत्वाची माहिती दिली आहे. मिलिंद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांनी तब्बल 10 हजार किलोमीटर धावण्याचा जणू विक्रमचं केला आहे. सोशल मीडियावरून त्यांनी माहिती देत सांगितल आहे, कोरोनामुक्त झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी 10 हजार किलोमीटर धावलो आहे. याबद्दल सोशल मीडियावर त्यांचं मोठ्या प्रमाणत कौतुक होतं आहे. सध्या मिलिंद सोमन अनेकांना फिटनेस गोल देत आहेत.