मुंबई 02 ऑगस्ट: सध्या मराठी हिंदी असा भाषेचा भेद न राहता कलाकारांना सर्वदूर प्रसिद्धी आणि चांगल्या भूमिका मिळताना दिसत आहेत. अनेक कलाकार सुद्धा स्वतःला एका भाषेतील कलाकार म्हणून ओळख मिळू न देता एक भरीत कलाकार म्हणून महती मिळावी म्हणून आग्रही राहिले आहेत. सध्या अनेक मराठी कलाकारांना सुद्धा बॉलिवूडमध्ये चांगल्या भूमिका मिळताना दिसत आहेत. असंच एक नाव समोर येत आहे ते म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग. (kshitee jog in rocky aur rani ki premkahani) क्षितीने नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांतून स्वतःला सिद्ध केलं आहे. क्षितीच्या निमित्ताने सगळ्याच मराठी कलाकारांना आनंदाची बातमी मिळाली आहे. क्षिती येत्या काळात धर्मा प्रॉडक्शनच्या रॉकी और रानी की प्रेमकहानी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूट नुकतंच संपलं असून एक जंगी wrap party सुद्धा आयोजित करण्यात आली होती. याचा एक व्हिडिओ स्वतः रणवीरने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये रणवीर क्षितीला जोरदार मिठी मारताना दिसत आहे. क्षितीने सुद्धा शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरी टाकून शेअर केले होते. हे ही वाचा- ‘नको तिथे विष ओकू नका…’; म्हणत Bigg Boss Marathi फेम उत्कर्ष शिंदेनी शेअर केला ‘तो’ VIDEO क्षिती नेमकं यामध्ये कोणतं पात्र साकारत आहे हे अजून समोर आलेलं नसलं तरी एकूणच या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये तिने बरीच धमाल केल्याचं दिसून येत आहे. तसंच तिचं रणवीर सिंगशी झालेलं बॉण्डिंगसुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. क्षितीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनी कमेंट्स करून तिचं अभिनंदन केलं आहे.
क्षिती मागच्या काळात झिम्मा या सिनेमात दिसून आली होती. सात बायकांच्या या चमूमध्ये सुद्धा तिने साकारलेलं पात्र एकदम उठून दिसलं आणि तिचं बरंच कौतुक सुद्धा झालं होतं. क्षिती ही हिंदी मालिका आणि वेबविश्वात सुद्धा सक्रिय आहे. तिला या हिंदी सिनेमात बघण्यासाठी चाहते आणि प्रेक्षक बरेच उत्सुक आहेत.