Home /News /entertainment /

चाहत्याचा सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरात राडा, झटापटीत वडील जखमी

चाहत्याचा सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरात राडा, झटापटीत वडील जखमी

एका व्यक्तीने सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) घरात घुसण्याचा प्रयत्न करत तिच्या वडिलांना जखमी केलं आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून सोनालीचं कुटुंब घाबरलं आहे.

  मुंबई, 25 मे-  अभिनेत्री (Actress) म्हटलं की त्यांचे चाहतेही आलेच. हे चाहते कलाकारांवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. कधी ते त्यांच्यासाठी काही खास करून त्यांचं लक्ष आकर्षित करतात. तर कधी त्यांना त्रास देऊन त्यांच्या मनात भीती निर्माण करतात. असच काहीस घडलंय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सोबत. एका व्यक्तीने तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत तिच्या वडिलांना जखमी केलं आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी एका अज्ञात इसमाने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या इसमाने मी सोनालीचा चाहता असून, मला तुमच्या घरात राहू द्या, असं म्हणत घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
  यावेळी सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांनी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनतर त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (हे वाचा:VIDEO: 'भाऊ समजून माफ करा', आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी ) असा हा धक्कादायक प्रकार पाहून सोनालीचं कुटुंब घाबरलं आहे. सोनालीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ती आपल्या पतीसोबत सध्या दुबईमध्ये आहे. तिच्या गैरहजेरीत अज्ञात इसमाने घरी येऊन हा सगळा गोंधळ घातला आहे. त्यामुळे सोनालीसुद्धा चिंतेत आहे. (हे वाचा:HBD: ..अन् सोहाने सगळा स्वयंपाकच करपवला, अशी झाली कुणालच्या लव्हस्टोरीची सुरुवात   ) कलाकारांचा विविध चाहत्यांशी संपर्क येत असतो. त्यांना हाताळता हाताळता त्यांच्या नाकी नऊ येत असतं. अनेक सामाजिक ठिकाणी त्यांना अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यांना या सर्वांची सवयदेखील झालेली असते. मात्र थेट घरी येऊन अज्ञात इसमाने असा गोंधळ घातल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या