Home /News /entertainment /

HBD: कुणालला इम्प्रेस करायच्या नादात सोहाने सगळा स्वयंपाकच करपवला, अशी झाली लव्हस्टोरीची सुरुवात

HBD: कुणालला इम्प्रेस करायच्या नादात सोहाने सगळा स्वयंपाकच करपवला, अशी झाली लव्हस्टोरीची सुरुवात

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) कुणाल खेमू(Kunal Khemmu) आपल्या कॉमेडी अंदाजामुळे ओळखला जातो. त्याने अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत.

  मुंबई, 25 मे-  बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) कुणाल खेमू (Kunal Khemmu) आपल्या कॉमेडी अंदाजामुळे ओळखला जातो. त्याने  अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. मात्र त्याने सुरुवातीच्या काळात गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र फारच कमी लोकांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती आहे. त्याच्या कारकिर्दीप्रमाणंच त्याची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच मजेशीर आहे. सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कुणालच्या लव्ह स्टोरीबद्दल (Love story)  आज आपण अशाच काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
  View this post on Instagram

  A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

  कुणाल आणि सोहा सर्वप्रथम ‘ढूँडते रह जाओगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान भेटले होते. मात्र त्यावेळी या दोघांमध्ये जास्त बोलणंही होत नसे. ते फक्त आपल्या चित्रिकरणावर लक्ष देत होते. त्यांनतर त्यांची पुन्हा भेट ‘99’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी पहिल्यांदा सोहा अली खानला कुणालबद्दल ओढ वाटली. (हे वाचा:'बोले चुड़ियाँ'च्या चित्रीकरणावेळी बेशुद्ध झालो, करण जोहरनं सांगितला अजब किस्सा  ) कुणालला वाटत होतं की सोहा पदवीधर आहे. ऑक्सफर्डमधून पदवी प्राप्त केली आहे आणि ती  या क्षेत्रात काय करतेय. त्यांनतर त्यांच्यात संवाद सुरु झाला आणि हळूहळू दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागलं. त्यातूनच त्यांचं प्रेम फुलत गेलं. कुणालने खास फिल्मी अंदाजात सोहाला प्रपोज केलं होतं. (हे वाच: ‘छू कर मेरे मन को’ हे गाणं ऐकून चिडले होते बिग बी ) सोहाला स्वयंपाक अजिबात करता येत नाही. सोहा तर कधी किचनमध्येसुद्धा गेली नव्हती. मात्र कुणालला उत्तम स्वयंपाक करता येतो. तर दुसरीकडे लग्नापूर्वी सोहाने कुणालवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिने पूर्ण स्वयंपाक करपवून ठेवला होता. तरीसुद्धा कुणालने ते अगदी प्रेमाने खाल्लं होतं. त्यांनतर त्यांनी सोहाच्या आईला लग्नासाठी कन्वेंस केलं होतं. 2015 मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांना इनाया ही 2 वर्षांची मुलगीसुद्धा आहे. अशा या दिलदार अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Kunal khemmu

  पुढील बातम्या