मुंबई, 6 नोव्हेंबर- ‘भाऊबीज’ **( Bhaubeej 2021 )**या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि औक्षण केल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. प्रत्येक बहीण- भावासाठी हा सण खास असतो. महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही (sonalee kulkarni ) यंदा भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. याचं कारण म्हणजे लग्नानंतरची सोनालीची ही पहिलीच भाऊबीज आहे. माहेरवाशीण म्हणून पुण्यात घरी आलेल्या सोनालीसाठी हा दिवस फारच महत्त्वाचा होता. तिनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ही भावा बहिणीची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. सोनालीने भाऊबीजनिमित्त खास फोटो शेअर करत म्हटले आहे की, भावा-बहिणीच्या नात्यातील स्नेहबंध वृद्धिंगत करणाऱ्या भाऊबीजेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ..सोनालीच्या भावाचे नाव अतुल कुलकर्णी आहे. ती तिच्या भावासोबत खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीचे भावासोबत खास बॉन्डिंग आहे.
सोनाली आणि तिचा भाऊ या फोटोत फुल मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. सोनालीचा लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण आहे. पती कुणालसोबत तिनं उत्साहात दिवाळी सण साजरा केला आहे. यासाठी केलेली तयारी असेल किंवा पाडव्याचे फोटो असतील सोनलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाचा: महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट भाऊबीजनिमित्त शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. सोनाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. लग्नानंतरच्या प्रत्येक सणाचे फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. वाचा : Video : अभिनेत्रीच्या मुलाचं थाटात झालं बारसं ; असं ठेवलं बाळाचं नाव सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आज सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करीत तिने यशाच्या शिखरापर्यंत मजल मारली. सोनालीने तिच्या करिअरच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तिच्या या प्रत्येक सुखःदुखात तिच्या कुटुंबीयांनी तिला साथ दिली. आज ती एक यशस्वी अभिनेत्री होण्यामागे तिच्या कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे.