मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट ; मराठीसहीत इंग्रजी भाषेत होणार चित्रित

महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट ; मराठीसहीत इंग्रजी भाषेत होणार चित्रित

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणारा “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” ( Chatrapati Tararani )हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणारा “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” ( Chatrapati Tararani )हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणारा “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” ( Chatrapati Tararani )हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 6 नोव्हेंबर- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास सांगणारा “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” ( Chatrapati Tararani )हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni ) ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल आहे.

‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशियो फिल्म्स’ यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील नावाजलेली ‘ब्लॅक हँगर स्टुडिओ ‘ आणि ‘ओरवो स्टुडिओ’ ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणारा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव करणार असून कथा लेखन आणि संवाद लेखन डॉ सुधीर निकम यांनी केलं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात महाराणी ताराराणींची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने एक पोस्ट लिहिली होती. त्यात ती या चित्रपटाबद्दल म्हणाली होती की, “छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, या जबाबदारीची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना”.

वाचा : विकीची एक्स गर्लफ्रेंड सुंदरतेत कतरिनाला देते मात, हॉलिवूडमध्ये केलंय काम

सोनी मराठी वाहिनीवर येत्या 15 नोव्हेंबर पासून महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारित “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे हि ताराराणींची भूमिका निभावणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Sonalee Kulkarni