मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video : अभिनेत्रीच्या मुलाचं थाटात झालं बारसं ; असं ठेवलं बाळाचं नाव

Video : अभिनेत्रीच्या मुलाचं थाटात झालं बारसं ; असं ठेवलं बाळाचं नाव

उर्मिला निंबाळकरच्या मुलाचं नुकतच मोठ्या थाटात बारसं साजरं करण्यात आलं.तिनं तिच्या बाळाच्या बारशाचा खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

उर्मिला निंबाळकरच्या मुलाचं नुकतच मोठ्या थाटात बारसं साजरं करण्यात आलं.तिनं तिच्या बाळाच्या बारशाचा खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

उर्मिला निंबाळकरच्या मुलाचं नुकतच मोठ्या थाटात बारसं साजरं करण्यात आलं.तिनं तिच्या बाळाच्या बारशाचा खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर- मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने  (Urmila Nimbalkar )काही दिवसापूर्वी मुलाला जन्म दिला आहे. यानंतर तिनं तिच्या बाळाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता तिनं तिच्या बाळाच्या बारशाचा खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.तिच्या बाळाला देखील भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यासोबतच बाळाच्या नावाची देखील चर्चा होत आहे.

उर्मिला निंबाळकरच्या मुलाचं नुकतच मोठ्या थाटात बारसं साजरं करण्यात आलं. या सोहळ्याला नातेवाईक, मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. यावेळी उर्मिलाचा भाऊ आयपीएस वैभव निंबाळकर हे देखील उपस्थित होते. बारश्याला निळ्या रंगाची थीम आयोजित केली असल्याने सगळ्यानी त्याच रंगाचे कपडे परिधान केलेले पाहायला मिळाले.

वाचा : नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! ब्रायडल लुकवर खिळल्या नजरा

आपल्या बाळाचं नाव काय असावं यावर चर्चा सुरू झाली त्यावेळी “अथांग ” या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केला. ज्याचा थांग कधीच लागत नाही तो म्हणजे अथांग. व्यापक, समुद्राला, आकाशाला हे विशेषण दिलं जातं नावाप्रमाणेच त्याचे विचार त्याचं मन व्यापक असुदेत त्याला कसलीही जात, धर्म, भाषा, पंथ, नकारात्मकतेची कुठलीच कुंपणं त्याच्या मनाला नकोत या विचाराने त्यांनी आपल्या बाळाचं नाव अथांग ठेवायचं ठरवलं आहे. चाहत्यांना देखील हे नाव खूप आवडलं आहे.

" isDesktop="true" id="627675" >

उर्मिला निंबाळकर हीने काही दिवसांपूर्वी आपल्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ युट्युबवरील तिच्या चॅनलवर अपलोड केला होता . पुण्यातील प्रसिद्ध ढेपे वाडा येथे तिचा हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला होता.

उर्मिला निंबाळकरने दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिकातून अभिनय केला आहे. 9 फेब्रुवारी 2013 रोजी उर्मिलाने सुकीर्तसोबत लग्न केले. उर्मिलाचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. युट्यूबर म्हणून तिनं वेगळी ओळख मिळवली आहे. या माध्यमातून ती विविध माहिती तसेच टिप्स शेअर करत असते.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress