Home /News /entertainment /

'तुला शेवटची वॉर्निंग जर तू पवार साहेबांविषयी बोललीस तर...' केतकीवर सविता मालपेकर भडकल्या

'तुला शेवटची वॉर्निंग जर तू पवार साहेबांविषयी बोललीस तर...' केतकीवर सविता मालपेकर भडकल्या

अभिनेता किरण माने, मानसी नाईक या कलाकारांनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सविता मालपेकर ( Savita Malpekar ) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

    मुंबई, 16 मे-  ketki chitale controversy : 'अभिनेत्री केतकी चितळे प्रकरण मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (NCP President Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणं केतकी चितळेला(Actress Ketki Chitale) चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळेचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनी तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. अभिनेता किरण माने, मानसी नाईक या कलाकारांनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सविता मालपेकर ( Savita Malpekar ) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सविता मालपेकर यांनी फेसबुकला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सविता मालपेकर म्हणाल्या की, 'ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर माझा ना संताप-संताप झालाय. माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळत असेल की.. काय लायकी आहे तिची? काय असं कर्तृत्व काय आहे.. तर काय एखाद-दुसऱ्या सिरीयलमध्ये काम केलंय. ज्या सिरियलमध्ये तिला स्वत:चं काम सुद्धा टिकवता आलेलं नाही. त्या मुलीने असं काही तरी बोलावं? हे बघ केतकी.. हे तू जे बोलली आहेस, तू जे लिहलं आहेस.. हे तू केलंच आहेस पण तुझा खरा बोलविता धनी कोणी तरी दुसरा आहे. त्याचा तर शोध आम्ही घेणारच. पण सगळ्यात आधी तुझा समाचार घेणार. अगं कुठल्या माणसाविषयी बोलतेस तू? हिमालयाएवढं कर्तृत्व असलेल्या माणसाविषयी बोलतेस तू. अगं तू तर शूद्र आहेस गं.. तुझी लायकीपण नाहीए. त्यांचं नाव घेण्याची. त्या माणसाविषयी बोलतेस. हे बघ लक्षात ठेव केतकी.. पवार साहेब आमच्या सगळ्यांना वडीलधाऱ्यांप्रमाणे आहेत. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल बोललेलं आम्ही सहन करणार नाही.' वाचा-ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याप्रकरणी रवीना टंडनचं ट्वीट चर्चेत 'तुझा समाचार तर आम्ही सगळे जण घेणारच आहोत. पण आता आता जर तू माझा समोर असतीस ना.. तर मी तुझं काय केलं असतं ना.. हे मला सांगता येत नाहीए. ऐकून तर तुला माहितीच असेल की, मी काय करु शकते ते. एक कलाकार म्हणून मी बोलतेय आणि राष्ट्रवादीची सांस्कृतिक सेलची प्रदेश सरचिटणीस म्हणून मी तिला इशारा देतेय की, याच्या पुढे जर तू असं काही बोललीस आणि जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाही, पवार साहेबांची माफी मागितली नाही तर जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालेपकर नाही.' वाचा-'माझी बायको, माझी सोलमेट....' डॉ श्रीराम नेनेंची माधुरीसाठी रोमॅंटिक पोस्ट 'जसं तुला मी पाठिशी घातलं होतं तुझ्यावर अन्याय झाला होता तेव्हा. तसंच तुला मी शिक्षाही करु शकते. माझी चांगली बाजू जशी तू बघितलेली आहेस तशी वाईट बाजूही तुला कळेल. तेव्हा आमच्या वडिलांबद्दल बोललेलं.. अगं आमचे आयडॉल आहेत ते. त्या माणसाने केवढं केलेलं आहे. महाराष्ट्रच काय जगाचा लाडका माणूस आहे तो.शरद पवार हे नाव घेतलं तरी माणसं थरथरतात. अशा माणसाविषयी तू बोलतेस. नाही केतकी तुझा बोलविता धनी दुसराच आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तो कोण आहे याचा शोध घेणार नाही तर मुकाट्याने तू सांगायचं आहेस की, तुला हे सगळं कुणी करायला लावलंय ते. तुला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल वेळीच तर पवार साहेबांची माफी मागायची.' 'तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर तू पवार साहेबांविषयी किंवा इतर कुणाविषयी काय बोललीस तर तुला सोडणार नाही. अगं का असं वागता तुम्ही? या तुमच्या अशा वागण्यामुळे इंडस्ट्रीचं नाव खराब होतं. हे लक्षात येतंय का तुझ्या? का तुझ्या एकटीमुळे सगळ्यांच्या नावाला बट्टा लावतेस?..'अशा शब्दात अभिनेत्री सविता मालपेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या