Home /News /entertainment /

Madhuri Dixit 55th birthday : 'माझी बायको, माझी सोलमेट....' डॉ श्रीराम नेनेंची माधुरीसाठी रोमॅंटिक पोस्ट

Madhuri Dixit 55th birthday : 'माझी बायको, माझी सोलमेट....' डॉ श्रीराम नेनेंची माधुरीसाठी रोमॅंटिक पोस्ट

Madhuri Dixit Birthday: आजचा दिवस माधुरीसाठी खास आहे मग तिचा नवरा डॉ श्रीराम नेने (Madhuri Dixit Husband Dr. Shriram Nene) यांनी देखील बायकोचा वाढदिवस खास करण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 15 मे- बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज तिच्या आय़ुष्यातील खास दिवस साजरा करत आहे. माधुरी आज 55 वर्षांची (Madhuri Dixit 55th birthday) झाली आहे. सोशल मीडियावर(Social Media) चाहत्यांकडून माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजचा दिवस माधुरीसाठी खास आहे मग तिचा नवरा डॉ श्रीराम नेने (Madhuri Dixit Husband Dr. Shriram Nene) यांनी देखील बायकोचा वाढदिवस खास करण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. माधुरीसाठी नेने यांनी रोमॅंटीक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील प्रेम भावना(Dr Shriram Nene share romantic post) तिच्यासाठी व्यक्त केल्या आहेत. माधुरी दीक्षितला नवरा डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी तिला अतिशय रोमॅंटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरीसोबतचा एक सुंदर असा फाटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शन देखील अतिशय सुंदर आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझी बायको, माझी सोलमेट, माझी सर्वात चांगली मैत्रिण.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि जगातील सर्वोत्तम गोष्टी तुला मिळाव्यात. येणारी वर्ष अप्रतिम असो आणि आपली अशीच सोबत असुदे... हॅपी बर्थ डे सोलमेट्स... अशी काहीशी रोमॅंटिक पोस्ट नेने यांनी माधुरीसाठी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सकडून माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा-अभिनेता अक्षय कुमार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात; वर्षभराने पुन्हा व्हायरसने गाठलं 15 मे 1967 मध्ये मुंबईत झाला माधुरीचा जन्म 15 मे 1967 मध्ये मुंबईत माधुरीचा जन्म झाला. आज माधुरी तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातील तिची सुंदरता वाढतच चालली आहे.
  चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरीसोबतचा एक सुंदर असा फाटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांना देखील खूप आवडलेला आहे. एका तासाच्या आत या फोटोला पाच लाखांच्या वर लाईक्स आल्या आहेत. शिवाय चाहत्यांच्या शुभेच्छांनी कमेंट बॉक्स फुल झाला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Madhuri dixit

  पुढील बातम्या