Home /News /entertainment /

बाबांच्या कुशीत विसावलेल्या या चिमुकलीला ओळखलं का? आज आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री

बाबांच्या कुशीत विसावलेल्या या चिमुकलीला ओळखलं का? आज आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री

‘दिल दोस्ती दुनियादारी’(Dil Dosti Duniyadari) मालिकेतून ही अभिनेत्री घराघरात पोहचली आहे.

  मुंबई, 20 मे-  बालपणीच्या (Childhood Memories) आठवणी खरोखरच रम्य असतात. प्रत्येक व्यक्ती बालपणीच्या आठवणीत रमत असतो. कलाकारसुद्धा याला अपवाद नाहीत. आपण दररोज एका कलाकाराच्या बालपणीच्या आठवणीना उजाळा देत असतो. आज आपण पाहणार आहोत अभिनेत्री (Marathi Actress)  सखी गोखलेच्या (Sakhi Gokhale) बालपणीच्या आठवणी. ‘दिल दोस्ती दुनियादारी’(Dil Dosti Duniyadari) मालिकेतून रेश्मा म्हणजेच सखी घराघरात पोहचली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

  अभिनेत्री सखी गोखलेने काही दिवसांपूर्वी आपला बालपणीचा फोटो शेयर केला होता. यामध्ये ती आपल्या वडिलांसोबत दिसून येत आहे. चिमुकली सखी आपल्या बाबांच्या कुशीत विसावलेली दिसत आहे. सखी यामध्ये खुपचं गोंडस दिसत आहे. सखी ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेता मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

  सखीला अभिनयाचा वारसा आपल्या आई-वडिलांकडूनचं मिळाला आहे. सखीने मालिका, नाटक, चित्रपट तिन्ही माध्यमात आपला ठसा उमठवला आहे. सखीने आपल्या अभिनयाची सुरुवात हिंदी जाहिरातींमधून केली आहे. सखीने 2013 मध्ये ‘रंगरेज’ या हिंदी चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर सखी झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत झळकली. या मालिकेतील तिच्या ‘रेश्मा’ या साध्याभोळ्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. (हे वाचा:बालकलाकार कसा झाला दक्षिणेचा सुपरस्टार? पाहा Junior NTR चा थक्क करणारा प्रवास ) ‘दिल दोस्ती दुनियादारी’ एकत्र राहणाऱ्या मित्रांची ही कथा तरुंनांमध्ये तुफान लोकप्रिय झाली होती. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भागसुद्धा काढण्यात आला होता. दुसऱ्या भागातसुद्धा सखी झळकली होती. या मालिकेतील सह कलाकार अभिनेता सुव्रत जोशीसोबत सखीने लग्न केलं आहे. (हे वाचा: ...अन् सेटच गेला उडून; चक्रीवादळामुळं सलमान खानचं कोट्यवधींचं नुकसान ) सखीचं आपल्या आईशी खुपचं घट्ट नातं आहे. सखीला अभिनया ऐवजी फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. तिने याचे रीतसर शिक्षणसुद्धा घेतलं आहे. तसेच सखीने काही जाहिरातींसाठी फोटोग्राफी सुद्धा केली आहे. तसेच सखी सध्या युके मध्ये राहून आर्ट क्यूरेशनचं शिक्षण घेत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Sakhi gokhale

  पुढील बातम्या