मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: बालकलाकार कसा झाला दक्षिणेचा सुपरस्टार? पाहा Junior NTR चा थक्क करणारा प्रवास

HBD: बालकलाकार कसा झाला दक्षिणेचा सुपरस्टार? पाहा Junior NTR चा थक्क करणारा प्रवास

अभिनेता ज्युनियर Ntr (Junior Ntr) आपला 38 वा वाढदिवस(38 Birthday)  साजरा करत आहे.

अभिनेता ज्युनियर Ntr (Junior Ntr) आपला 38 वा वाढदिवस(38 Birthday) साजरा करत आहे.

अभिनेता ज्युनियर Ntr (Junior Ntr) आपला 38 वा वाढदिवस(38 Birthday) साजरा करत आहे.

मुंबई, 20 मे- अभिनेता ज्युनियर Ntr (Junior Ntr) दाक्षिणात्य (South Superstar) चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक उत्कृष्ट तेलुगु चित्रपट केले आहेत. आज हा अभिनेता आपला 38 वा वाढदिवस(38 Birthday)  साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी.

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

तेलुगु चित्रपट सृष्टीत अनेक उत्तम कलाकार आहेत. त्यातीलचं एक म्हणजे ज्युनियर Ntr हा होय. या अभिनेत्याचं खर नाव नंदमूर्ती तारक रामा राव असं आहे. ज्युनियर Ntr चा जन्म हैद्राबाद आंध्रप्रदेश मध्ये झाला आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री Ntr रामा राव यांचा तो नातू आहे.

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

ज्युनियर Ntr ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. त्याने पहिल्यांदा 1996 मध्ये ‘रामायण’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केल होतं. आणि महत्वाच म्हणजे या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे.

(हे वाचा:'कारभारी लयभारी' फेम अनुष्काच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा VIRAL PHOTO  )

त्यानंतर एक मुख्य अभिनेता म्हणून त्याने ‘Ninu Chadoolani’ या तेलुगु चित्रपटातून पदार्पण केल होतं. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा ‘स्टुडंट नं 1’ मधून पुनरागमन केलं होतं. ज्युनियर Ntr अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. त्याच्या चाहत्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे.

ज्युनियर Ntr ने आपल्या अष्टपैलू अभिनयाने तेलुगु चित्रपटसृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ज्युनियर Ntr ला 2 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘फिल्मेफेअर’ पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

(हे वाचा:'आम्ही प्रत्येक चित्रपटासाठी ऑडिशन देतो...',स्टार किड्सवर भडकली मल्लिका शेरावत)

त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने तेलुगु अभिनेत्री लक्ष्मी प्रनीथीशी लग्न केल आहे. त्यांनी 2011 मध्ये लग्न केल होतं. हा लग्नसोहळा खुपचं रॉयल असा होता. जवळजवळ 10 हजार लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

First published:
top videos

    Tags: Entertainment, South indian actor