जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'रणवीर सिंग चारचौघात गेल्यावर करतो भलतेच चाळे...' रोहिणी हट्टंगडी यांचे वक्तव्य चर्चेत

'रणवीर सिंग चारचौघात गेल्यावर करतो भलतेच चाळे...' रोहिणी हट्टंगडी यांचे वक्तव्य चर्चेत

रोहिणी हट्टंगडी यांचे वक्तव्य चर्चेत

रोहिणी हट्टंगडी यांचे वक्तव्य चर्चेत

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल- ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आलं आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेता रणवीर सिंगची तुलना अभिनेता रणबीरसोबत केली. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी हट्टंगडी म्हणाल्यात की, रणवीर सिंगची रणबीर कपूरची तुलना करत म्हणल्या रणवीरची वर्तणूक चारचौघात गेल्यावर चांगली नसते. एक अभिनेता म्हणून रणवीर सिंग खूप चांगाल आहे. मात्र या सगळ्यात मला रणबीर कपूर जास्त आवडतो. रणवीर ज्याप्रमाणे पब्लिकमध्ये गेल्यावर वागतो ते तरुण पिढीच्या दृष्टीने योग्य आहे पण त्याच्या वयाच्या व्यक्तींना ते शोभत नाही. रणवीर एक पब्लिक फिगर आहे मग त्याने तशीच वर्तणूक केली पाहिजे, अशा देखील रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या. या मुलागतीत रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातील त्या काळाबद्दल सांगितलं, जेव्हा त्यांना फक्त आईची भूमिका साकरण्यासाठी विचारलं जायचं. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘अग्निपथ’ सिनेमा करण्यापूर्वी मी ठरवलं होतं की, आता यापुढं आईची भूमिका करायची नाही. यासाठी मी तीन-चार सिनेमांना नकार देखील दिला होता. पण माझी मॅनेजर असा नकार देऊ नका असं देखील मला सांगत होती. रोहिणी हट्टंगडी यांनी पडद्यावर आईची भूमिका नव्हती करायची त्यावेळी रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं की, मी नकारात्मक भूमिका करायला तयार आहे पण मला आईची भूमिका करायची नाही. तसेच यावेळी त्यांनी ‘अग्निपथ’ हा सिनेमा करायला का तयार झाल्या याबद्दल सांगितलं. जेव्हा मला ‘अग्निपथ’ सिनेमाची ऑफर मिळाली. तेव्हा मी सांगितलं की, पहिल्यांदा कथा ऐकनार आणि नंतर निर्णय घेणार.

News18लोकमत
News18लोकमत

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की, मी फक्त अर्धी कथा ऐकली होती, मग चित्रपट करण्यास होकार दिला. चित्रपटात आईची भूमिका साकारण्यास होकार देण्यामागचे कारण सांगताना त्या म्हणाल्या की, अमिताभ यांच्या चित्रपटात नायिका, खलनायक आणि नायक ठळकपणे दिसतात. ‘अग्निपथ’मध्ये कमिश्नर आणि पठाणपासून ते बहिणीपर्यंत सगळेच दिसणार होते. रोहिणी यांनी अनेक चित्रपटांमध्ये जितेंद्र, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या आईची भूमिका साकारली आहे. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात