मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रिंकू राजगुरूला गुलाबी साडीत पाहून चाहते सैराट, पाहा Photo

रिंकू राजगुरूला गुलाबी साडीत पाहून चाहते सैराट, पाहा Photo

सैराट फेम मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील (rinku rajguru new look)  तिचे काही पांरपरिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या सैराट कमेंट येत आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर : सैराट फेम मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू (rinku rajguru) सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव असते. ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. रिंकुने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील (rinku rajguru new look) तिचे काही पांरपरिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या सैराट कमेंट येत आहेत.

रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर साडीतील पारंपरिक लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात रिंकू खूपच सुंदर दिसत आहे. यात तिने साडी नेसून पारंपारिक लुक केलेला आहे. तिने यामध्ये गुलाबी आणि हिरव्या रंगाची भरजरी काठाची साडी नेसली आहे . केसात माळलेला गजऱ्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. साडीमधील तिचा हा हा अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चाहत्यांकडून या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरु आहे. आतापर्यंत या फोटोला 31 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

तिच्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्याने म्हटले आहे की, रूबाब, तर दुसऱ्याने आयो पाटलाची आरची कशी दिसतेय आता..अशी कमेंट केली आहे. अशा एकापेक्षा एक कमेंट करत चाहत्यांनी रिंकूच्या साडी लुकचे कौतुक केले आहे. यासोबतच रिंकू तिच्या फिटनेसचे देखील व्हिडिओ शेअर करत असते. रिंकूने मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयचा ठसा उमठवला आहे.

वाचा : आईसोबत असणारी गोंडस मुलगी ओळखली का? आज आहे बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री

रिंकूच्या कामाविषयी सांगायचे तर ती छूमंतर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे अभिनेता सुक्रत जोशी, ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. यासोबतच रिंकू चा झुंड हा बहुचर्चित हिंदी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन तसेच आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Rinku rajguru