मुंबई, 25 एप्रिल- सैराट फेम रिंकू राजगुरू (Rinku Rajguru ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. रिंकू राजगुरूला (Rinku Rajguru latest Video ) प्रेम झालं आहे. विश्वास बसणार नाही पण तिचा हा क्यूट व्हिडिओ पाहून मात्र चाहत्यांना तिच्यावर पुन्हा प्रेम झालं आहे. रिंकू राजगुरूनं नुकतच तिच्या इन्स्टाला एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. ती ‘प्यार हुआ चुपके से’ या हिंदी गाण्यावर मस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिचा हा क्यूटवाला अंदाज पाहून चाहते मात्र पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत. चाहत्यांकडून तिच्यावर रेड हार्ट इमोजीचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोइराला हिच्यावर चित्रीत झालं आहे. मनीषा कोइराला ज्याप्रमाणे या गाण्यावर एक्सप्रेशन देते त्याप्रमाणे रिंकू देखील या गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. वाचा- अमृता पवारचा होणाऱ्या हबीसोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ व्हायरल, पाहायला मिळालं प्रेम.. रिंकूनं तिच्या या क्यूट व्हिडिओला सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, क्षणभर विचार करणे थांबवा आणि जीवन तुम्हाला जी संधी देत आहे याचा आनंद घ्यायला शिका.
रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे मेकअप, कागर आणि अलिकडेच आलेला ‘झुंड’ हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले.