मुंबई, 24 एप्रिल- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava) मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) हिचा 4 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ (amruta pawar engagement ceremony video ) समोर आला आहे. अमृता पवारचा साखरपुडा 4 एप्रिल रोजी झाला होता. नुकताच अमृतानं तिच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. अमृतानं नील पाटील (neel patil) याच्यासोबत साखरपुडा केला आहे. नील हा बायोमेडिकल इंजीनियर आहे. या लव्हली कपलच्या रोमॅंटिक व्हिडिओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांचाही रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना भलताच अवडलेला दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. या दोघांचा हा व्हिडिओ पाहून फक्त प्रेम आमि प्रेम याचं चित्र पाहायला मिळतं. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती या दोघांच्या लग्नाची. वाचा- ‘देवमाणूस 2 मालिकेत होणार तांबडे बाबाची एंट्री, पाहायला मिळणार नवीन ट्वीस्ट अमृताने शालेय शिक्षण मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले येथून पूर्ण केले. आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स कॉलेजमधीन पदवीचे शिक्षण घेतेले. अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात दुहेरी या मराठी मालिकेतून केली. यानंतर तिनं ये रे ये रे या डान्स शो मध्ये भाग घेतला. त्याच वर्षी तिने स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली.
अमृता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत अभिनेत्री वीणा जगतापची एंट्री होणार आहे. यामुळे मालिका आता अधिक रंजक होणार आहे.
झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava) ही नवी मालिका काही दिवसापूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक जोशी ला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. तर अमृता पवार (Amruta Pawar) हिने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून जिजाबाईंची भूमिका साकारली होती.